काय हा वेडेपणा ! ऑपरेशन थिएटर बांधले, पण दरवाजाच विसरले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हा हास्यास्पद प्रकार आहे बांसवाडा जिल्ह्यातील सर्वात मोठं असणाऱ्या महात्मा गांधी हॉस्पिटलचा. जिल्ह्यातील सर्वात मोठं महात्मा गांधी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरला पाहून अनेकांना हाच प्रश्न पडला आहे, की ओटी बांधणारा कंत्राटदार वॉर्डला दरवाजाच ठेवायचा कसा विसरला ?

क्रेनच्या साह्याने बांधकाम साहित्य वर पोहोचवलं. विशेष म्हणजे कंत्राटदाराला शेवटपर्यंत हे लक्षात कसं आलं नाही. डॉक्टरांनीही याकडे लक्ष दिलं नाही. २५ खाटांचे सुसज्ज असे ओटी बांधले आता या वॉर्डसाठी कसा रस्ता तयार करावा? या विचारात सर्व अधिकारी आहेत.

धक्कादायक म्हणजे मागील बाजूने अडीज फुटांचा आपत्कालीन दरवाजा आहे. तेथूनच रुग्णांना यावे लागणार आहे. या दरवाजातून स्ट्रेचर किंवा अन्य मशीन नेता येणार नाहीत. या हॉस्पिटलतील ऑपरेशन थिएटरसाठी एक कोटीचं बजेट ठेवण्यात आलं होतं. वरील मजल्यावर २५ बेडच्या सर्जिकल वॉर्ड बांधण्यासाठी परवानगी मिळाली. याची जबाबदारी राष्ट्रीय आरोग्य मिशनला सोपविण्यात आली होती. या वॉर्डचे बांधकाम आता पूर्ण झालं आहे. परंतु, एक मोठी चूक समोर आली. या वॉर्डला येण्याजाण्यासाठी दरवाजाच बांधण्यात आलेला नाही. याची जबाबदारी राष्ट्रीय आरोग्य मिशनला सोपविण्यात आली होती.

आपत्कालीन दरवाजाची वाट छोटी असल्याने तीही वाढवता येणार नाही. आता पाठीमागे एक दरवाजा काढून तिथे जिना बांधावा लागणार आहे. मात्र, यात मोठा फजितवाडा होणार आहे. कारण, ओटीमध्ये फार कमी वेळात रुग्णांना पोहोचवावे लागते.

आता या वॉर्डसाठी कसा रस्ता तयार करावा, या विचारात सर्व अधिकारी आहेत. एकंदरीत हे सारे पाहता सरकारी कंत्राटदाराचा हास्यापद प्रकार समोर आला आहे.