ब्रेकिंग : उपविभागीय दंडाधिकाऱ्याचा स्टेनो १४ लाखाची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा आॅनलाइन – मौजे अस्नोली (ता. भिवंडी, जि. ठाणे) येथील शेतजमिनीबाबतचा फेरफार रद्द करण्याचा निकाल देण्यासाठी १४ लाखाच्या लाचेची वेळोवेळी मागणी करून ती लाच स्वीकारणाऱ्या भिवंडी येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील स्टेनोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.

सुनिल तुकाराम कांबळे (वय ५०, स्टेनो, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, भिवंडी) असे त्याचे नाव आहे. त्याने २२/१०/२०१८, २५/१०/२०१८, ०१/११/२०१८, ०५/११/२०१८, १३/११/२०१८ आणि १९/११/२०१८ रोजी १५ लाखाच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोडी अंती 14 लाख रुपये ठरले होते. त्याने काल रात्री लाचेची रक्कम स्वीकारली. त्यामध्ये ५० हजार रुपये च्या ओरिजिनल नोटा असून इतर नोटा ह्या डमी आहेत.

पुण्यातील 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या