उपविभागीय अधिकारी गोवर्धन ढाके यांच्या फोटोला तृतीय क्रमांक

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – उपविभागीय अधिकारी गोवर्धन ढाके यांच्या फोटोला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

पाटबंधारे विभागाच्या राज्यस्तरीय जळगाव येथे झालेल्या तीन दिवसीय विविध स्पर्धेमध्येत जळगाव येथे झालेल्या विविध स्पर्धे मध्ये गोवर्धन ढाके यांच्या निसर्ग चित्र फोटोग्राफीला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे.

18 जानेवारी जळगाव येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी(मेटा) चे उपविभागीय अधिकारी वर्ग-1 गोवर्धन वसंत ढाके यांच्या चित्राला सदर पुरस्कार मिळाला.

त्यांच्या या यशाबद्दल माजी मुद्रांक जिल्हाधिकारी प्रवीण वायकोळे , एमआयडीसी पुण्याचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ, बी, एस .एन. एल. चे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कदम, लासलगाव नुतन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय होळकर, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सोनवणे, लासलगाव ची उद्योजक महेंद्र राणा, बांधकाम व्यवसायिक मनी पंडित, कृषी पर्यवेक्षक संजय चौधरी, नरेंद्र हिंगमिरे, नटवर डागा, नितीन वाघ, सुबोध चव्हाण, अभय संगवे,रतन खैरनार, राजेंद्र बकरे यांनी अभिनंदन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/