दुर्देवी ! अमळनेरहून पुण्याकडे येताना नाशिक जिल्हयात उपविभागीय पोलिस अधिकारी (DySp) अपघातात जागीच ठार

अमळनेर : पोलीसनामा ऑनलाइन – अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील भोई गावाजवळ घडली. राजेंद्र ससाणे यांची गाडी 150 फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे हे सुटीनिमित्त दोन दिवस घरी जात असताना नाशिक जिल्ह्यातील वडाले भोई गावाजवळ असलेल्या 150 खोल दरीत त्यांची गाडी कोसळली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ससाणे हा पुण्याच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अपघात स्थळावरून ओळखीच्या एका इसमाने गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शाह यांना या अपघाताबाबत माहिती दिली. हे वृत्त अमळनेरमध्ये धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत सालस स्वभाव असलेल्या अधिकाऱ्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे .