Video : मोबाइल चोरून पळणार्‍या चोराला पोलिसाने पकडले फिल्मी स्टाइल, अ‍ॅक्शन सीन सारखे दृश्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आपण अ‍ॅक्शन फिल्ममध्ये नेहमी पाहतो की, एखादा पोलीस अ‍ॅक्शन स्टाइलमध्ये पळणार्‍या चोराला पकडतो. लोकांना असे सीन खुप पसंत पडतात. परंतु, असे खरोखरच्या जीवनात सुद्धा शक्य आहे. असेच एक दृश्य चेन्नईत सुद्धा पहायला मिळाले, जे कोणत्याही अ‍ॅक्शन फिल्मच्या सीनपेक्षा कमी नव्हते. येथे एका पोलिसाच्या चोर पकडण्याच्या पद्धतीचे कौतूक होत आहे. या पोलीस कर्मचार्‍याने एकदम फिल्मी स्टाइलमध्ये चोराला पकडले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

आयपीएसने म्हटले – हा कोणत्याही फिल्मचा सीन नाही

शनिवारी ग्रेटर चेन्नईचे पोलीस आयुक्त महेश अग्रवाल यांनी सब-इन्स्पेक्टर अँटलिन रमेश यांचे कौतूक करत एक व्हिडिओ शेयर केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, हा कोणत्याही फिल्मचा सीन नाही. तर खर्‍या जीवनातील हिरो सब-इन्स्पेक्टर अँटलिन रमेशचा आहे, ज्यांनी एकट्यानेच मोबाइल हिसकावून पळणार्‍या चोराला पकडले, जो चोरीच्या बाईकने पळत होता. यानंतर आणखी तीन लोकांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून 11 हिसकावलेले चोरीचे मोबाइल जप्त केले आहेत.

सब-इन्स्पेक्टरला सन्मानित केले

नंतर महेश अग्रवाल यांनी दोन छायाचित्रे सुद्धा शेयर केली आणि सोबत कॅपशनमध्ये लिहिले, सब-इन्स्पेक्टर अँटलिन रमेश यांना सन्मानित केले आणि त्यांच्यासोबत एक कप चाय वर चर्चा केली. अँटलिन रमेश यांचा हा व्हिडिओ नंतर चेन्नई पोलिसांच्या ट्विटर हँडरवरून सुद्धा शेयर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅपशनमध्ये चेन्नई पोलिसांनी लिहिले आहे की, पोलीस आयुक्तांनी एसआय अँटलिन रमेश यांचे कौतूक करताना त्यांना खर्‍या जीवनातील हिरो म्हटले आहे. कारण त्यांनी बाईकवरून माधवराम परिसरात मोबाइल चोराचा पाठलाग करू त्याला पकडले.