उपनिरीक्षक सानप आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांनी पुण्यामध्ये रेल्वेखाली आत्महत्या केली होती. सानप यांच्यावर एका महिलने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर सानप यांनी पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी बलात्काराचा आरोप करणारी महिला, तिचा पोलीस उपनिरीक्षक पती व त्याची प्रेयसी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद सानप यांच्या पत्नीने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादेवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात रेल्वे समोर उडी मारून मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या

उपनगर पोलीस ठाण्यात शैला साजन सानप (३०, रा. प्रथमेश पार्क, त्रिवेणी चौक, जेलरोड) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार त्यांचे पती साजन सखाहारी सानप हे मुंबई शहरातील अंबोली पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. पती साजन सानप हे गत साडेतीन वर्षांपासून आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी देत मद्यप्राशन करून वेळोवेळी बलात्कार केल्याची फिर्याद या परिसरातील महिला शिक्षिका तथा पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने सोमवारी (दि.२६) उपनगर पोलीस ठाण्यात दिली. यावर पोलिसांनी बलात्कार तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याच्या घटनेनंतर पती साजन सानप यांनी मंगळवारी (दि़२७) सकाळी पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या केली.

पती साजन सानप यांच्याविरोधात बलात्काराची फिर्याद देणारी ३५ वर्षीय शिक्षिका व तिचा पोलीस उपनिरीक्षक पती यांनी संगनमत करून १ जानेवारी २०१५ ते २७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत वेळोवेळी घरी येत होते. तर संशयित शिक्षिका ही साजन सानप यांच्याकडे अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करीत होते, मात्र ती पूर्ण न केल्यानेच शिक्षक महिला व तिचा पती हे ब्लॅकमेल करीत होते. तसेच बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याची धमकी दिली होती.

पोलीस उपनिरीक्षक व त्याची शिक्षक पत्नी यांनी संगनमताने कट रचून पतीच्या अज्ञात प्रेयसीच्या मोबाईलवर असलेले खोटे-नाटे संभाषण मिळवून पती साजन सानप यांच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यामुळे पती साजन सानप यांची सामाजिक प्रतिमा खराब करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले़ या गुह्याचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते करीत आहेत.