वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

उन्नव : पोलिसनामा ऑनलाईन – वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणार भाजपचे खासदार साक्षी महाराज ( sakshi maharaj ) पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे़ उत्तर प्रदेशातल्या उन्नवमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमता साक्षी महाराज ( sakshi maharaj ) उपस्थित होते़ त्यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात होता, असं गंभीर आरोप करत काँग्रेसच्या लोकांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवल्याचं ते म्हणाले. या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे़.

साक्षी महाराज म्हणाले, सुभाषचंद्र बोस यांचा अकाली मृत्यू झाला. काँग्रेसच्या लोकांनीच त्यांची हत्या घडवून आणली, असा माझा आरोप आहे. बोस यांची लोकप्रियता अतिशय जास्त होती. त्यांची लोकप्रियता पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा अधिक होती. बोस यांच्या लोकप्रियतेसमोर महात्मा गांधीही कुठेच नव्हते, असंही ते म्हणाले. आपल्याला स्वातंत्र्य मागून मिळालेलं नाही. कारण इंग्रज इतके साधे नव्हते. तुम मुझे खून दो,मैं तुम्हे आझादी दूंगा, असं सुभाषचंद्र बोस म्हणायचे. त्यामुळे आपल्याला रक्त सांडून स्वातंत्र्य मिळालं आहे, असं मला वाटतं,’ अशा शब्दांत साक्षी महाराज यांनी बोस यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

भाजपकडून पराक्रम दिवसाचं आयोजन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारनं पराक्रम दिवसाचं आयोजन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्र्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली वाहिली.