“मनी ट्रेल” चे पुरावे सादर करा : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांनी १५ लाखांचा निधी पुरवल्याचा आरोप सिद्ध करा, याचबरोबर विचारवंतांना परदेशी शक्‍ती निधी पोचवत असल्याच्या “मनी ट्रेल’चे पुरावे पोलिसांनी सादर करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b0e2c33-af53-11e8-8b03-153e85cbc2a7′]

यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ” अटक केलेल्यांपैकी पॅरिसच्या परिषदेला कोण गेले होते? गेले असतील तर कुठल्या विमानतळावरून गेले? त्यांनी तेथे काय भाषणे केली ? याचे पुरावे पोलीसांनी सादर करायला हवेत.अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली. पुढे त्यांनी भारतविरोधी कामासाठी फ्रान्स किंवा नेपाळ किंवा अमेरिका या देशांना भूमीचा वापर झाल्याबद्दल नाराजी व्यक्‍त करणारी पत्रे भारत सरकारने पाठवली का, असा खडा सवाल सरकारला विचारला.

जाहीरात

सनातनशी संबंधित गुन्हेगारांना पकडले तेव्हा पोलिसांनी पत्रकारपरिषदा का घेतल्या नाहीत, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे भारतीय नेत्यांच्या हत्येचे कट रचले जात असल्याचे पत्र अद्याप समोर का आणले जात नाही? काही अराजकीय संस्था स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सरकारवर टीका करीत असतील, तर त्यांच्याविरोधात आरोपांचे कुभांड रचणे हा प्रकार अयोग्य आहे. असे आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना भेटीच्या वेळी सांगुन आपली नाराजी व्यक्त केली.

याबरोबरच , जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या मदतीने प्रकाश आंबेडकर सरकार उलथवून टाकण्याचा कट रचत असल्याचा आरोप उपलब्ध कागदपत्रांतून समोर आला आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की कोणत्याही दुसऱ्या विचारसरणीचे सरकार खाली खेचावे यासाठी अन्य राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रयत्न करीत असतातच. असे उत्तर त्यांनी दिले .

यादरम्यान यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही चर्चा केली. कायदा हातात घेणारे आणि सशस्त्र उठाव करणारे जंगलात राहतात, असे एका वृत्तपत्रांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

अशी आहेत प्रकाश आंबेडकर यांची मतं –

  • अराजक माजवणाऱ्या संघटनांकडून सरकार बदलण्याची भाषा
  • पाचपैकी तिघांचा एल्गार परिषदेला विरोध
  • सरकारवर बोचरी टीका म्हणजे देशद्रोह नाही
  • पाच जणांवरील आरोप टिकणार नाहीत

जाहीरात