‘या’ अभिनेत्रीमुळे सुबोध भावेने स्वीकारली ‘तुला पाहते रे’ची ऑफर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कमी कालावधीत प्रत्येकाच्या घराघरात पोहचणारी ‘तुला पाहते रे’ मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यामधील सर्वांना भोवणारी भूमिका म्हणजे अभिनेता सुबोध भावेनी साकारलेली विक्रांत सरंजामेची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत नेहमीच नवनवीन वळणांमुळे प्रेक्षकांच्या मनात मालिका पाहण्याची एक वेगळीच उत्सुकता असते. या मालिकेत नुकतेच मालिकेत राजनंदिनीची एन्ट्री झाली आहे. या मालिकेची ऑफर सुबोध भावे यांनी स्विकारण्याचे कारण सांगितले आहे. हे कारण कोणते ते जाणून घेऊया..

नुकतेच मालिकेतील शिल्पा तुळसकर, सुबोध भावे, आणि गायत्री दातार यांनी चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी सुबोध भावे नी सांगिलते की, ‘गायत्रीचे अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा लहानपणापासूनच होती. त्यामुळे कदाचित गायत्रीचे स्पप्न पूर्ण करण्यासाठी मी ही मालिका स्विकारली. मला त्या काळात मालिकेत काम करायची इच्छा होती. मालिका हे माध्यम मला खुप आवडते. आणि निर्माता, दिग्दर्शक, कलाकार अशा सगळ्या गोष्टी जुळल्या होत्या, त्यामुळे मी ही मालिका स्विकारली.

अभिनेत्री शिल्पा तुळसकरने ही मालिका स्विकारण्याचे कारण सांगितले. ती म्हणाली की, ‘बऱ्याच वर्षांनी एक मराठी मालिकेची ऑफर आली होती. राजनंदिनीच्या भूमिकेविषयी मला आधीच समजवण्यात आले होते. त्यामुळे मला असे वाटले की, छोट्या पडद्यावर कमबॅक करायचे असेल तर यापेक्षा दमदार दुसकी भूमिका असू शकत नाही.’ असेही तिने सांगितले.