महाराष्ट्र पोलिसांच्या ‘त्या’ भन्नाट ट्विटला सुबोध भावेनं दिली दिलखुलास ‘दाद’

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये मुंबई पोलीस रस्त्यावर तैनात आहेत आणि गुन्ह्यांची उकल करण्यात देखील व्यस्त आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये मुंबई पोलीस रस्त्यावर आणि सोशल मीडियावर दोन्ही ठिकाणी सक्रीय आहे.कोरोना दरम्यान केलेल्या भन्नाट ट्विटमुळे महाराष्ट्र पोलीस यापूर्वी चर्चेत आले होते. पुन्हा एकदा अशाच एका ट्विटमुळे महाराष्ट्र पोलीस चर्चेत आले आहे. लॉकडाऊनमध्ये ही वेगवेगळ्या मार्गाने सायबर क्राईम होत आहे. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी एक भन्नाट ट्विट केलं असून सध्या याच ट्विटची चर्चा आहे.

लॉकडाऊन काळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी पोलिसांनी कट्यार काळजात घुसली सिनेमाच्या पोस्टरची मदत घेतली आहे. पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे की, सायबर गुन्ह्यांची ‘कट्यार’ तुमच्या अकाऊंटमध्ये घुसू देऊ नका ! जेव्हा तुम्हाला कोणी – वेगवेगळ्या अकाउंटचे पासवर्ड वेगळे आहेत ना ? असं विचारतं. तेव्हा अभिमानान ‘खाँ साहेबांसरखे’ उत्तर द्या, बेशक हमारे पासवर्ड का होई सानी नहीं. बहुत ही बुलंत और बेमिसाल है हमारा पासवर्ड, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या ट्विटला अभिनेता सुबोध भावे यांनी रिट्विट केलं आणि त्यांच्या कामाचे कौतुक देखील केलं आहे. सुबोध भावे यांनी रिट्विट करून लिहले आहे की, वाह वाह महाराष्ट्र पोलीस.. तुमच्या कल्पना निरागस सुरासारख्या आहेत… आपल्या सुरक्षित हातामाध्ये महाराष्ट्राचं मनमंदिर तेजाने उजळून निघू दे… सध्या दोघांचेही ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.