शरद पवारांवर सिनेमा येणार ? सुबोध भावे म्हणाला – ‘पवारांची भूमिका साकारायचीय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी अभिनेता सुबोध भावेनं आतापर्यंत देशातील अनेक महापुरुषांच्या भूमिका साकारल्या आहेत. आता सुबोधचं म्हणणं आहे की, त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका साकारायची आहे. त्यानं स्वत: याबाबत सांगितलं आहे.

शरद पवार यांची भूमिका साकारण्याबद्दल सुबोधनं खूप आधीच सांगितलं आहे. सुबोधनं शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली तेव्हा त्यानं आपल्या भावना मांडल्या. सुबोध म्हणाला, “सातत्यानं व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा जो नेता योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल.” असं तो म्हणाला आहे.

संवेदनशील व सामाजिकदृष्ट्या सजग भान असलेला अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून सुबोध ओळखला जातो. सुबोधनं मराठी सिनेमात लोकमान्य टिळक, डॉ काशीनाथ घाणेकर यांच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या भूमिकांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. आता शरद पवारांची भूमिका साकारण्याबद्दल त्यानं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे भविष्यात आता पवारांवर सिनेमात येईल का असा प्रश्न सुबोधच्या चाहत्यांना पडला आहे. परंतु आगामी काळातच या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना मिळणार हे मात्र नक्की.

You might also like