Subodh Kumar Jaiswal | CBI चे संचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह केंद्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकपदी (CBI Director) सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. याची दखल घेत हायकोर्टानं सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांच्यासह केंद्र सरकारला (Central Government) भूमिका स्पष्ट करण्याची नोटीस बजावली (HC Issued Notice) आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुमार त्रिवेदी (Retired ACP Rajendra Kumar Trivedi) यांनी जयस्वाल यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ही रीट याचिका दाखल केली आहे.

 

सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांना भ्रष्टाचारविरोधी प्रकरणाचा (Anti-Corruption Case) तपास करण्याच अनुभव (Experience) नसल्याचा दावा करत त्यांनी विश्वासार्हता संशयास्पद असल्याचेही त्रिवेदी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. मुद्रांक घोटाळा प्रकरणाच्या (Stamp Scandal Case) चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास समितीचे (Special Investigation Committee) नेतृत्व हे त्यावेळी जयस्वाल करत होते. त्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai CP Parambir Singh) यांचा ही समावेश होता. परंतु, या समितीवर तेव्हा अनेक आरोप करण्यात आले आणि त्यानंतर घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला.

जयस्वाल आपल्या पदाचा गैरवापर करत होते. आपण त्यांच्याविरोधात आवाज उठविल्याबद्दल आपली गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला.
त्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (Maharashtra Administrative Authority) बदली रद्द केली
असल्याचा आरोपीही त्रिवेदी यांनी याचिकेतून केला आहे. दुसरीकडे 2019 ते 2020 या काळात राष्ट्रवादीचे (NCP)
नेते अनिल देशमुख गृहमंत्री (Home Minister Anil Deshmukh) तर जयस्वाल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक
(DGP) असताना करण्यात आलेल्या बदल्या (Transfer) आणि पदांच्या शिफारशी जयस्वाल यांनी मंजूर केल्या होत्या.
आता तेच जयस्वाल सीबीआय संचालक असताना सीबीआय परमबीर यांच्या गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी कशी करु शकते? असा सवालही या याचिकेतून उपस्थित केला आहे.

 

तसेच अशा अधिकाऱ्याची सीबीआय सारख्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती करणं हे राष्ट्रीय सुरक्षा
आणि सार्वभौमत्वाशी संबंधित असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पूर्वग्रहच निर्माण करेल.
ज्यामुळे तपास यंत्रणेवर सामान्य जनतेने सोपवलेल्या विश्वासालाही तडा जाईल, असा थेट आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

 

Web Title :- Subodh Kumar Jaiswal | Bombay mumbai high court issued notice to cbi driector subodh kumar jaiswal and central government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Snehalaya Balbhavan HSC Result | यंदाही स्नेहालय मधील बालकांचा बारावीचा निकाल 100 टक्के

 

Kisan Vikas Patra | 1000 रुपयांपासून करू शकता बचतीला सुरुवात, इतक्या दिवसात डबल होतील पैसे

 

Eknath Khadse On BJP | ‘भाजपने माझ्यावर अन्याय केला परंतु शरद पवारांनी विश्वास दाखवत संधी दिली’ – एकनाथ खडसे