दिल्ली हिंसाचारावरून सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्ली सीमेवर मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उफाळला. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच 300 पोलिस जखमी झाले. याशिवाय आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून त्या ठिकाणी तोडफोड करत विविध झेंडे फडकवले. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारामागे पीएमओच्या (PMO) जवळील भाजप नेत्याचा हात असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपला घरचा आहेर दिला. आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून व्हायरल होणाऱ्या मसेजवर मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, एक चर्चा सुरु आहे, कदाचित त्यात काही तथ्य नसेल, ते खोटंही असू शकेल किंवा विरोधाकांच्या आयटी सेलने वावड्या उठवल्या असतील की, पीएमओच्या निटकवर्तीयांपैकी एक असलेल्या भाजपाच्या सदस्यांना लाल किल्ल्यावरील हिंसाचारात लोकांना भडकावण्याचं काम केलं. त्यामुळे नीट तपासून माहिती घ्यावी, असे सुब्रमण्यम स्वामी म्हटले आहे.