Subramanian Swamy | ‘रामसेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करा, नाहीतर…’ – सुब्रमण्यम स्वामींचा मोदींना इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तमिळनाडूपासून श्रीलंकेला जोडणारा पुराणकालीन पूल म्हणजे रामसेतू. या रामसेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याची मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) केली आहे. त्यांनी तसे न केल्यास त्यांना इशारा देण्यात आला आहे. सुब्रमण्यम स्वामींनी (Subramanian Swamy) ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

 

रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यासाठी स्वामी गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. यामुळे आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान केले आहे. तसेच इशारा देखील दिला आहे. रामसेतूचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात आतापर्यंत 16 वेळा सुनावणी पार पडली आहे. केंद्र सरकार या मुद्यावर टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्वामींनी केला आहे.

“जर का मोदी सरकारने रामसेतू पूलाला राष्ट्रीय वारसा घोषित केले नाही, तर आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची सत्ता जाणार आहे. किंवा हिंदुत्ववादी संघटना मोदी यांना पदावरुन खाली खेचणार आहे. हिंदुत्ववाद्यांनो आता ठरवा! आणि मोदींना निर्वाणीचा इशारा द्या”, असे ट्वीट स्वामी यांनी केले आहे.

 

https://twitter.com/Swamy39/status/1590610109511897089?s=20&t=sidm9JkIofKG5fneU3V20w

रामसेतूला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीराम यांनी रावणाचा वध करण्यासाठी या सेतूची निर्मिती केली होती.
आणि याच सेतूवरुन त्यांनी लंकेत प्रवेश करुन रावणाशी युद्ध करुन त्याचा पराभव करुन सीतेला परत आणले होते.
अशी हिंदूंची धारणा आहे. तर मुस्लिम समाजाच्या मते आदमने हा पूल पार केला होता
आणि लंकेतल्या एका शिखरावर प्रायश्चित्त म्हणून तो एक हजार वर्षे एका पायावर उभा होता.
त्यामुळे हा कळीचा मुद्दा आहे. त्यावर लवकर निर्णय येणे अपेक्षित नाही.
तरी देखील स्वामी यांनी हा वाद उखरुन काढला आहे. त्यावर आता केंद्र सरकार किंवा नरेंद्र मोदी काय भूमिका घेणार,
हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Subramanian Swamy | bjp mp subramanian swamy criticized pm narendra modi government over demand to declare ram setu as heritage monument

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharat Jodo Yatra | देशमुख बंधूंची अनुपस्थिती आणि प्रकाश आंबेडकरांच्या भाकितावर काँग्रेसचे स्पष्टीकरण

Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या सुटकेसाठी चंद्रकांत खैरे यांचे थेट देवांच्या कायदामंत्र्याला साकडे

Jacqueline Fernandez | आता न्यायालयाकडून ही ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; “जॅकलिनला अद्याप अटक का नाही?”