सुब्रमण्यम स्वामींचा PM नरेंद्र मोदींवर ‘हल्‍ला’ ; म्हणाले, ‘PM माझे विचार ऐकत नसल्याने मी चाललो चीनला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षात आपल्या विचारांना महत्व दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत यासंदर्भातली आपली नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले कि, मी या परिस्थितीत चीनला देखील जाऊ शकतो. त्यानंतर त्यांच्या ट्विटवर विविध माध्यमांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. यामध्ये स्वामींच्या हितचिंतकांनी त्यांना चीनला जाण्याचा सल्ला दिला तर काही जणांनी काय प्रॉब्लेम आहे असे विचारले. मंगेश नावाच्या एका यूजरने स्वामींना राम मंदिर आणि हिंदूंच्या मुद्द्यांवर न बोलण्याचा सल्ला दिला असता स्वामी यांनी त्याला उत्तर देत म्हटले कि, मी राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलणे कधीही सोडणार नाही.

खरेतर २९ जून रोजी सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते कि, चीनमधील प्रसिद्ध सिंघुआ यूनिवर्सिटीने मला सप्टेंबर मध्ये ‘चीनच्या आर्थिक विकासाची सात वर्षांतील समीक्षा’ या विषयावर त्यांना बोलण्यासाठी बोलावले असताना भारत मात्र त्यांच्या विचारांना महत्व देताना दिसत नसल्याचे दुःख त्यांनी आपल्या ट्विटमधून मांडले होते.

स्वामी फक्त राजकारणी म्हणून नाही तर आर्थिक बाबींचे सल्लागार तसेच अभ्यासक म्हणून देखील ओळखले जातात. त्याचबरोबर त्यांनी मागील सरकारमधील अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशविदेशातील अनेक संस्था त्यांना आर्थिक विषयावर बोलण्यासाठी आणि विचार मांडण्यासाठी आमंत्रित करत असतात.

लंडनमधील हॉवर्ड विद्यापीठात प्राध्यापक 

हॉवर्ड विद्यापीठात वयाच्या २४ व्या वर्षीच त्यांनी पीएचडी मिळवली आहे. तसेच वयाच्या २७ व्या वर्षांपासून ते या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यानंतर १९६८ मध्ये त्यांना दिल्ली स्कूल ऑफ़ इकॉनामिक्स मध्ये शिकवण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९६९ मध्ये ते दिल्ली आयआयटीमध्ये काम करू लागले. मात्र पंचवार्षिक योजनांवरील टीकेमुळे त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची नाराजी झेलावी लागली होती.

https://twitter.com/i_mangeshmhatre/status/1145268671750856704

https://twitter.com/Swamy39/status/1145166966358851584

औरंगाबादमध्ये शिवसेना, एमआयएममध्ये पुन्हा जुंपली

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानाने खळबळ

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी