नरेंद्र मोदी माझे विचार ऐकत नाहीत, म्हणून भाजपचा ‘हा’ मोठा नेता जाणार चीनला !

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली आहे. मोदी सरकार त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करत आहे अशी खंत त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, माझ्या विचारांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष केल्यास मी चीनला जाऊ शकतो. त्यांच्या या ट्विटवर सोशलमिडीयावर चांगल्याच प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. स्वामी यांच्या चाहत्यांनी, नाराजी सोडून चीनला न जाण्याची आवाहन केले आहे.

२९ जूनला एका ट्विटमध्ये स्वामी यांनी लिहिले होते की, चीनमधील प्रसिद्ध सिंघुआ यूनिवर्सिटीने सप्टेंनबर महिन्यात स्कॉलर्सच्या सभेत बोलावले आहे. विषय आहे – चीनचा आर्थिक विकास ७० वर्षांची समीक्षा. नरेंद्र मोदी माझ्या विचाराला समजून घेऊ इच्छित नाहीत. असच राहील तर मी चीनला जाऊ शकतो. अरुण जेटली अर्थमंत्री असताना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. सुब्रह्मण्यम स्वामी हे फक्त राजकारणीच नाही तर आर्थिक समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. भाषणासाठी विविध देशातील प्रसिद्ध विद्यापीठांकडून त्यांना बोलावले जाते.

भाजपवर का नाराज आहेत स्वामी
स्वामी भाजप पक्षाचे नेते असूनसुद्धा बऱ्याच वेळी ते पक्षाला अडचणीत आणतात. स्वामी यांनी नुकतेच EVM बद्दल मत व्यक्त केले होते. त्यांनी म्हंटले की, मी तर खूप आधीच EVM संबंधी पुरावे सर्वोच्च न्यायालयात दिले होते. EVM मध्ये घोटाळा करता येऊ शकतो हे न्यायालयाने मान्य देखील केले होते. यांमुळे स्वामी भाजपवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. या आधी देखील वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर त्यांनी टीका केली होती.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी