‘त्या’ हजारों जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 10 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन,मुजफ्फराबादच्या बालाकोट भागात 1000 किलो बॉम्ब फेकले. तसेच, भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्यात काही गैर नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

खरं तर हा हल्ला आपल्याच सिमेअंतर्गत झाला आहे. ज्याला POK- पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हटलं जातं. तर आपण आपल्या क्षेत्रात बॉम्ब लावू शकतो. त्यात काही गैर नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

जरी हा भाग त्यांचा आहे, असं ते म्हणतात, तर आमच्याकडे संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार आमच्याकडे आत्मरक्षाचा अधिकार आहे. पाकिस्तान हल्ला करत आहे, आणि त्यावर भारताला हजार जखमा देण्याची वक्तव्ये ते करत असतात. त्यावर आपल्या सरकारने त्यांना १००० बॉम्ब देऊन उत्तम काम केले आहे. त्यामुळे यात काही गैर नाही.

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर हल्ला करून एलओसीच्या नियामांचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानने भारतावर केला आहे. मात्र सुब्रह्मण्यम स्वांमींनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई