Subramanian Swamy | सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींची केली रावणाबरोबर तुलना

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Subramanian Swamy | पंढरपूरमध्ये कॉरिडॉर बनवण्यात येणार आहे. मात्र, या कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. पंढरपूरमध्ये बनवण्यात येणाऱ्या या कॉरिडॉरमुळे मंदिर परिसरात असलेले रस्ते 200 फूट वाढवण्यात येणार आहेत. यामुळे शेकडो घरांचे भूसंपादन होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि दुकानदार यांनी या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. यावरून आता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. (Subramanian Swamy)

 

 

रावणाबरोबर केली तुलना?

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट रावणासोबत केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले कि नरेंद्र मोदी रावणासारखे धार्मिक असल्याचा दावा करत उत्तराखंडमधील वाराणसी सारखे मंदिरे पाडत आहेत किंवा ती जागा बळकावत आहेत. आता पंढरपूर येथील पवित्र स्थळांची नासधूस करण्याची योजना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून आखली जात आहे. हे सगळे थांबवण्यासाठी मी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे असेदेखील ते म्हणाले. (Subramanian Swamy)

 

काय आहे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा?

वाराणसी कॉरिडॉर विकास योजनेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा करण्यात येणार आहे.
यामध्ये पंढरपूर शहरातील रस्ते, पूल, नदीकाठी घाट असे एकूण 65 एकर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.
तसेच शौचालये, पाणीपुरवठा, पालखी तळ विकास, भूसंपादन यासारख्या पायाभूत सुविधांचीदेखील कामे करण्यात येणार आहे.
या आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी 51 कामे पूर्ण झाली असून 6 कामे प्रगतीपथावर आहेत.
वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

 

Web Title :- Subramanian Swamy | subramanian swamy said modi is like
ravan demolishing temples in varanasi destruct holy sites of pandharpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा