सुशांत सिंह राजपूत सुसाई़ड केस : ‘सुशांतच्या मृत्यूसंदर्भात बॉलिवूडमधील दिग्गज नावं दुबईतील डॉनच्या संपर्कात’, या नेत्याचा दावा

पोलीसनामा टीम – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आत्महत्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे. आता राजकीय लोकही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करताना दिसत आहेत. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या प्रकरणी पत्र लिहिलं आहे. बॉलिवूडमधील काही मंडळी हे प्रकरण दाबत आहेत असा दावाही त्यांनी केला.

बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं दुबईतील डॉनच्या संपर्कात असून ती लोकं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

आपल्या पत्रात सुब्रमण्यम स्वामी म्हणतात, “माझे वकिल आणि सहकारी ईशकरण भंडारी यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कथित सुसाईडवर काही रिसर्च केला आहे. पोलिसांचा अद्यापही तपास सुरू आहे. मी माझ्या मुंबईतील सूत्रांकडून ऐकलं आहे की, बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं दुबईतील डॉनच्या संपर्कात आहेत आणि ते त्याला भेटून पोलीस तपासाच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून सुशांतनं आत्महत्या केली असं सिद्ध करता येईल.”

आपल्या पत्रात स्वामी पुढे म्हणाले, “मी अशी मागणी करत आहे की, मुंबई पोलिसांनी याची निपक्षपणे याचा तपास करावा. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल याच्या द्वारे सीबीआय चौकशीसाठी समहत करू शकता.” असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like