राष्ट्रगीतमध्ये बदल करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान मोदींना लिहले पत्र, ट्विटरवर लिहिली ‘ही’ पोस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रगीतमध्ये बदल करण्यासाठी पत्र लिहिले आहे. पीएम मोदी यांना पाठविलेले हे पत्रही स्वामींनी ट्विटरवरून शेअर केले आहे. त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, ‘जन गण मन….’ हे राष्ट्रगीत सभा सदनाचे मत म्हणून संविधान सभेमध्ये स्वीकारले गेले होते.

पुढे त्यांनी लिहिले की, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी ‘जन गण मन …’ राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले होते. तथापि, त्यांचा असा विश्वास होता की, भविष्यात संसद यामध्ये शब्दांचा बदल करू शकतील. स्वामींनी लिहिले आहे की, त्यावेळी एकमत होणे आवश्यक होते कारण अनेक सदस्यांचा विश्वास होता की, यावर वाद व्हायला हवा, कारण याला 1912 मध्ये कॉंग्रेसच्या अधिवेशनात ब्रिटिश राजाच्या स्वागतासाठी गायिले होते.

स्वामींनी पंतप्रधानांना संसदेत प्रस्ताव आणण्याचे आवाहन केले
सदस्यांच्या भावना लक्षात घेता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हे काम भावी संसदेवर सोडले होते. जन गण मनच्या धूनमध्ये बदल न करता त्यांचे शब्द बदलले पाहिजेत, असे स्वामींनी संसदेमध्ये ठराव आणण्यासाठी पंतप्रधानांना आवाहन केले. यामध्ये केवळ सुभाषचंद्र बोस यांनी केलेले बदल स्वीकारले जाऊ शकतात, असेही स्वामींनी सुचवले आहे.

‘जन गण मन ..’ या गाण्याचा हा इतिहास आहे.
‘जन गण मन ..’ हे गाणे 27 डिसेंबर 1911 रोजी प्रथम गायले गेले होते. हे गाणे रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिले होते. हे गाणे 28 नोव्हेंबरला इंग्रजी वर्तमानपत्रांच्या मुख्य बातमीत होते. संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मनची हिंदी आवृत्ती भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली.