Reliance Retail ने 24713 कोटी रूपयात खरेदी केले ‘फ्यूचर’ ग्रुपचे प्रमुख व्यवसाय

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ची सबसिडियरी कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ने शनिवारी घोषणा केली की, ते फ्यूचर ग्रुपचे किरकोळ आणि घाऊक व्यवसाय तसेच पुरवठा आणि साठवण व्यवसाय खरेदी करत आहेत. आरआरव्हीएल ही खरेदी 24,713 कोटी रूपयात करत आहे. रिलायन्स रिटेलच्या डायरेक्टर ईशा अंबानी यांनी याप्रसंगी म्हटले की, त्या फ्यूचर ग्रुपच्या ब्रँड्सना एक नवी स्थान दिल्याने आंनदी आहेत.

ईशा अंबानी म्हणाल्या, या व्यवहारासह, आम्ही फ्यूचर ग्रुपच्या प्रसिद्ध स्वरूपांना आणि ब्रँड्सना एक नवीन घर प्रदान करण्यासोबतच त्याच्या बिझनेस इकोसिस्टमला संरक्षित करून आनंदी आहोत, ज्याने भारताच्या अधुनिक किरकोळ क्षेत्राच्या विकासात महत्वाची भूमिका निभावली आहे. आम्ही छोटे व्यापारी आणि किराणा दुकानदारांसह मोठ्या ग्राहक ब्रँडसोबत सक्रिय सहकार्याच्या आमच्या वेगळ्या मॉडलसह किरकोळ उद्योगाची वाढ आणि वेग जारी ठेवण्याची आशा करतो. आम्ही देशभरात आमच्या ग्राहकांना लागोपाठ चांगली सेवा प्रदान करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.

या डिलमुळे फ्यूचर ग्रुपच्या किरकोळ आणि घाऊक उपक्रमांना रिलायन्स रिटेलमध्ये स्थानांतरित करण्यात येईल, तर फॅशन लाईफस्टाइल आणि लॉजिस्टिक्स व वेयरहौसिंग उपक्रमांना रिलायन्स रिटेल व्हेंचर्स (आरआरव्हीएल) मध्ये स्थानांतरित केले जाईल.

अरबपती किशोर बियानी यांच्या मालकीच्या फ्यूचर ग्रुपमध्ये सुपरमार्केट चेन बिग बाजार, अपमार्केट फुड स्टोर्स फुडहॉल आणि क्लोथिंग चेन ब्रँड फॅक्ट्रीचा समावेश आहे.

रिलायन्स रिटेलचे म्हणणे आहे की, या व्यवहारामुळे रिलायन्स रिटेलला या आव्हानाच्या काळात लाखो छोट्या व्यापार्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्यात मदत मिळेल. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचा भाग आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या मार्च 2021 च्या लक्ष्यानुसार अनेक महिने अगोदर जून 2020 मध्येच कर्जमुक्त झाली होती.