Subsidy For Onion | शेतकर्‍यांना दिलासा ! कांद्याला प्रतिक्विंटल 300 रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : Subsidy For Onion | राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान (Subsidy For Onion) देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत केली. यानिर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे. (Subsidy For Onion)

देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Web Title :- Subsidy For Onion | Relief for farmers! Chief Minister’s announcement in the Legislative Assembly to give a subsidy of Rs. 300 per quintal to onion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

Pune Crime News | रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन त्याने हिसकावला सोन्याचा हार; रंगावरुनच पोलिसांनी केले चोरट्याला जेरबंद

Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू