Lockdown मध्ये 10 हजारांची नोकरी गेली, पण ‘हा’ महिन्याला कमावतो 80 हजार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना (Corona) व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या (Job) गेल्या, काम सुटल्याने मोठ्या संख्येने लोकांना संकटाला आणि समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र असा एक माणूस आहे तो लॉकडाऊनच्या आधी महिन्याला 10 हजार रुपये कमावत होता, पण लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने आता तो महिन्याला तब्बल 80 हजार रुपये कमावतो.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (lockdown) या व्यक्तीचे आयुष्य बदलले. लॉकडाऊन काळात मिळालेल्या मोकळ्या वेळेचा त्याने उपयोग केल्याने आज त्याचे आयुष्य बदलले आहे. व्यवसायाने चित्रकला (painting) शिक्षक असलेल्या महेश कापसे (mahesh kapse) यांनी यावेळी आपली चित्रे सोशल मीडियावर (social media) पोस्ट करण्यास सुरुवात केली. त्याची चित्र एवढी लोकप्रिय झाली की, सिनेमातील कलाकारही या चित्रकाराचे चाहते बनले. बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख याने देखील महेश यांचे कौतुक केलं आहे. सध्या महेश दरमहा 80 हजार रुपयांची कमाई करत आहे.

मार्च-एप्रिलपूर्वी महेश यांना फारसं कोणी ओळखत नव्हते. महेश औरंगाबाद येथील एका शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होते. मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महेश यांची नोकरी गेली. नोकरी गेल्याने ते बुलढाणा येथील त्यांच्या गावी परतले. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नव्हेत. त्यामुळे मोकळ्या वेळेत करायचे तरी काय असा प्रश्न त्यांना पडला असतानाच त्यांनी चित्र काढण्याचे ठरवले. चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी वेळेचा सदुपयोग केला. स्वत: केलेली पेटिंग्स टिकटॉकवर अपलोड करु लागले. त्यानंतर महेशचे आयुष्य एकदम बदलले.

अल्पावधीतच महेश यांची लोकप्रियता वाढली. सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या कलेचे चाहते बनले. महेशला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळू लागली. क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन यांनी त्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. बड्या कलाकारांनी देखील त्याचे कौतुक केले. महेशने सांगितले की, सुरुवातीला मी माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांचे चित्र काढण्यास सुरुवात केली, त्यातून बऱ्याच ऑर्डर मिळाल्या. एका दिवसात 2-2,3-3 ऑर्डर येऊ लागल्या. सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यामुळे महिन्याकाठी 40 ऑर्डर मिळतात आणि प्रत्येक पेटिंग्ससाठी ते 2 हजार रुपये घेतात. तर पेटिंग करण्यास महेशला केवळ 10 मिनिटे लागतात.

महेशची आजी पार्वती या सांगतात की, तो माझा नातू आहे. पेटिंग्स करुन त्याने प्रगती केली. चित्रकलेत त्याला मिळालेल्या प्रसिद्धी बद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. माझा नातू एवढा पुढे जाईल याची विचारही केला नव्हता. पण आज तो जे काही आहे स्वत:च्या कर्तृत्वावर आहे. महेश यशवंतराव आर्ट कॉलेजच्या क्लासमध्ये नेहमीच पाहिले. परंतु त्यांच्या टँलेंटला आता लॉकडाऊनमध्ये प्रसिद्धी मिळाली.