Success Story : मुलीला जन्म दिल्यानं सासरच्या लोकांनी घराबाहेर काढलं, न्याय मिळवण्यासाठी बनली ‘न्यायाधीश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते की ज्यावेळी नेमकं काय करावं तेच समजत नाही. मात्र अशावेळेस जे संकटांशी सामना करतात तेच पुढे टिकून राहतात. असेच काहीसे अवनिका गौतम यांनी करून दाखवले आहे. वृंदावन येथील अवनिका या आपले वैवाहिक जीवनात खूप खुश होत्या आणि अचानक असे काही घडले की ज्यामुळे त्या खूप दुःखी झाल्या मात्र त्यांनी हिम्मत हारली नाही.

त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरले आणि मोठ्या कष्टाने पीसीएस-जे ची परीक्षा पास केली. आज त्या झारखंडच्या उच्च न्यायालयात असिस्टेंट रजिस्ट्रारच्या पदावर कार्यरत आहेत. पीसीएस-जे उत्तीर्ण करून त्यांची सिव्हिल जज कनिष्ठ विभाग पदावर निवड झाली होती. जाणून घेऊयात हा प्रवास त्यानी कसा पार पाडला.

अवनिका गौतम यांचे लग्न 2008 मध्ये जयपूरमध्ये झाले होते. सर्व काही ठीक सुरु होते मात्र अचानक अवनिका यांच्याकडे त्यांच्या सासरच्यांनी हुंडा मागायला सुरुवात केली याचा पुढे त्याना खूप त्रास झाला. मात्र तरीही त्या हे सर्व सहन करत होत्या.

मुलगी होताच घरातून काढले
हुंडा मागूनही सासरचे शांत बसले नाही अवनिका यांना मुलगी होताच सासरच्यांनी त्यांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर अवनिका पुन्हा वृंदावन येथे आल्या आणि त्यांनी मनात ठरवले की आता त्या गप्प बसणार नाहीत.

न्यायालयात मारल्या चक्रा
सासरच्यांकडून मिळालेल्या वागणुकीविरोधात अवनिका न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागली. यासाठी अनेक वकिलांची मदत देखील घेतली मात्र यामुळे त्याना खूप त्रास झाला शेवटी त्यानी स्वतः वकिली करण्याचा निर्णय घेतला.

2012 मध्ये सुरु केली तयारी
यानंतर अवनिकाने मोठा निर्णय घेतला त्या दिल्लीला आल्या आणि त्यांनी पीसीएस-जे ची तयारी सुरु केली. 2013 मध्ये त्यांनी तयारी सुरु केली होती आणि अखेर 2014 मध्ये त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांची निवड झारखंडच्या पीसीएस-जे साठी करण्यात आली.

Visit : Policenama.com