केवळ एका वर्षात केली तयारी अन् लाखो रूपयांची नोकरी सोडून बनली न्यायाधीश

जमशेदपूर : पोलिसनामा ऑनलाइन – आपण याआधी अत्यंत कठीण प्रसंगातून किंवा उन्हाचे चटके सोसून यशस्वी झालेल्या व्यक्तीच्या कहाण्या पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, लाखो रुपयांची नोकरी सोडून न्यायाधीश होण्याचं स्वप्न एका मुलीने साकार केलं आहे. हिना असं त्या मुलीचं नाव असून, तिने UP PCSJ २०१९ ची न्यायाधीशाची परीक्षा पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

झारखंड मधील जमशेदपूर येथील रहिवाशी असलेल्या हिनाला एका मोठ्या कंपनीत भरभक्कम पगाराची नोकरी होती. पण तीच तिथं मन लागेना. ही गोष्ट तिने आपल्या पालकांना सांगितली. आणि तिनं आपल्या नोकरीवर पाणी सोडलं व न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी तयारी सुरु केली.

हिनाने सांगितलं, मी डिसेंबरमध्ये नोकरी सोडली आणि जानेवारीच्या तयारीला सुरुवात केली. UP PCSJ परीक्षेत प्रथमच उत्तीर्ण होऊ शकले नाही. परंतु, पूर्वपरीक्षेत चांगले गुण मिळाले. नंतर एका वर्षांमध्ये यशस्वी होऊन UP PCSJ २०१९ च्या परीक्षेत न्यायाधीश झाले. एका वर्षाच्या तयारीत पहिल्यांदाच २०१८ मध्ये बिहार, झारखंड, राजस्थान पूर्व परीक्षेत निवड झाली.

कशी केली तयारी…

हिना म्हणाली, प्रत्येक राज्यामध्ये परीक्षा सारख्याच असतात. पण जीके आणि जीएस अशा असतात. या विषयांच्या विभक्ततेमुळे परीक्षा कठीण होते. म्हणून, विद्यार्थी ज्या राज्यात परीक्षा देतो, त्यास त्या राज्याची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तसेच सुरुवातीपासून अंतिम परीक्षेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आधी पूर्वपरीक्षा आणि मग मुख्यपरीक्षा असं न करता दोन्हीसाठी अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे. तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत, त्यासाठी सुरुवातीपासून कायद्याचं वाचणं आवश्यक असून केस कायद्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. परीक्षेची तयारी करताना एकाच सोर्सचा उपयोग करावा. जितका सोर्स तेवढं अधिक गुंतागुंतीचं होत. तसंच चालू घडामोडी अधिक चांगल्या लक्षात राहण्यासाठी व्हिडीओ पाहत असल्याचं, तिने सांगितलं.