Success Story : एका झटक्यात लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडली तिनं, वर्षभरात तयारी करून झाली न्यायाधीश

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात स्पर्धा परीक्षांची तयारी अनेक विद्यार्थी करत असतात. यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परिश्रम घेऊन रात्रंदिवस कसून अभ्यास करतात. यात काही जणांना अपयशाचा सामना करावा लागतो तर काही विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचतात. आणि काही विद्यार्थी हे एक आदर्श घालून देतात. अशीच एक विद्यार्थिनी म्हणजे हिना कौसर. हिना कौसर या UP PCS-J 2019 परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधीश झाल्या आहे. त्यासोबतच त्यांनी एक नवा आदर्श  घालून दिला आहे.

हिना कौसर या झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण हे जमशेदपूर इथेच झाले आहे. हिना यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अलिगड मुस्लिम विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बंगळूरमधून एलएलएम पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी क्लॅटची परीक्षा दिली. पदव्युत्तर करत असताना त्यांनी नोकरी देखील केली. त्यांनी तब्बल अडीच वर्ष एका खासगी कंपनीत नोकरी केली आणि नोकरी करत अभ्यास देखील चालू ठेवला.

त्यांना चांगली नोकरी होती. सगळं काही सुरळीत चालू होते. तसेच नोकरीमध्ये त्यांना चांगल्या पॅकेजच्या ऑफर देखील येत होत्या. असे असूनही त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं त्यामुळे त्या चांगल्या पॅकेजच्या नोकरीवर देखील संतुष्ट नव्हत्या. याबाबत त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितले असता त्यांनी देखील सकारात्मक विचार करत “जर तू खुश नसेल तर काही वेगळं करायचं असेल तर प्रयत्न केले पाहिजे” असे सांगितले. तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांना उभारी मिळाली आणि त्यांनी नोकरी सोडली. नंतर लगेचच त्यांनी न्यायपालिकेच्या परिक्षेची तयारी सुरू केली.

हिना यांनी पहिल्यांदा UP PCS-J ची परिक्षा दिली त्यात त्यांना अपयश आले पण त्या खचून न जात पुन्हा जोमाने तयारीस लागल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर UP PCS-J 2019 ची परीक्षा एका वर्षातच पास होऊन मोठं यश मिळवलं. त्यांची 2018 च्या बिहार, झारखंड, राजस्थान न्यायपालिकेच्या पात्रतेच्या परीक्षेमध्ये निवड करण्यात आली.

अशी करावी परीक्षेची तयारी

हिना कौसर यांनी परीक्षेची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शनही केले असून त्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श म्हणून नावारूपास आल्या आहेत. ही परीक्षा प्रत्येक राज्यात एकाच वेळी होत असते तसेच या परीक्षेचा पॅटर्न हा जिके (जनरल नॉलेज) आणि जीएस (सामान्य अभ्यास) यावर ती आधारीत असतो. त्यामुळे विद्यार्थी हा ज्या राज्यातील असतो त्या राज्याबाबत त्याला संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. कारण एकूणच त्या राज्यातील सर्व बाबींवर प्रश्न हे आधारित असतात.

ही परीक्षा तीन टप्प्यात होते. पात्रता परीक्षेची तयारी करत असतानाच मुख्य परीक्षेची देखील तयारी करणे गरजेचे असते. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मुलाखत होत असते. त्यासाठी सर्व कायद्यांबाबत अभ्यास असणे हे गरजेचे असते. तसेच कौसर म्हणाल्या की, जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा त्यात सातत्य ठेवत एकाच तथ्याला धरून अभ्यास केला पाहिजे. त्यांनी सामान्य ज्ञान या विषयावर अभ्यास करत असताना फक्त व्हिडिओ पाहण्यावर भर दिला होता. अशा पद्धतीने हिना कौसर यांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर न्यायाधीश पदी मजल मारली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/