IAS Success Story : अंकितानं सोशल मिडीयापासून दूर राहून मिळवलं IAS परीक्षेमध्ये यश, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हरियाणाच्या रोहतकमधील अंकिता चौधरीसाठी आयएएस परीक्षेत यशस्वी होणे म्हणजे स्वप्न साकार होण्यासारखे होते. हे पद मिळविण्यासाठी ती बरीच दिवस प्रयत्न करत होती, त्यांनतर 2019 मध्ये तिची निवड झाली. निकालानंतर अंकिताला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. पण अंकिताची निवडच होण्याबरोबरच तिने ऑल इंडिया रँक 14 देखील मिळविले होते. यातूनच अंकिताने आपल्या महम शहराचेही नाव उज्ज्वल केले, जेथून या परीक्षेत निवडली गेलेली ती पहिली उमेदवार आहे. जाणून घेऊया अंकिताच्या यशाची कहाणी

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार
बाळाचे पाय पाळणातच दिसतात, ही म्हण अंकिताला लागू होते. तिचे प्रारंभिक शिक्षण रोहतक येथील इंडस पब्लिक स्कूलमधून झाले होते, त्यानंतर ती दिल्लीत पदवी घेण्यासाठी गेले. तेथील हिंदू महाविद्यालयातून तिने बीएससी पदवी मिळविली आणि त्यानंतर दिल्ली आयआयटीमधूनच एमएससी म्हणजेच पदव्युत्तर शिक्षण घेतले. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर अंकिताने पूर्ण नागरी सेवा देण्याचे ठरवले होते आणि सर्व काही सोडून तिने त्याकडे लक्ष केंद्रित केले.

वडिलांचे नाव केले उज्वल
अंकिताचे वडील सत्यवान साखर कारखान्यात अकाउंटंट म्हणून काम करतात. अंकिताच्या या यशामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी सांगितले कि, माझी मुलगी पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती, म्हणूनच तिला बारावीनंतर शिष्यवृत्ती मिळाली. यामुळे, तिच्या अभ्यासामध्ये कधीही आर्थिक समस्या उद्भवल्या नाही. अंकिताची आई जेबीटी शाळेत शिक्षिका होती पण काही वर्षांपूर्वी तिचा एका रोड अपघातात मृत्यू झाला. अंकिताने तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटूंबियांना दिले आहे ज्यांनी नेहमीच तिचे समर्थन केले आणि लहान भागातील असूनही, मुलगी आणि मुलामध्ये कधीही भेदभाव केला नाही. याचा परिणाम म्ह्णून अंकिताने पुढे जाऊन निर्णय घेतले आणि यश मिळविले.

दुसऱ्यांदा झाली निवड
अंकिताने मनापासून प्रयत्न केले, तिची पहिल्यांदा निवड झाली नाही. यानंतर,तिने पुन्हा प्रयत्न केला आणि या वेळी, मागील चुका समजून घेत, सर्व उणीवा भरून काढल्या. परिणामी अंकिताची केवळ निवड झालीच नाही तर ती टॉपर म्हणून पुढे आली. तिच्या तयारीबद्दल बोलताना अंकिता सांगते की, काय करावे हे , प्रत्येक उमेदवाराला काही काळानंतर कळते, पण काय करू नये हेदेखील महत्वाचे आहे. तिच्या बाबतीत बोलताना ती म्हणते की, दोन वर्षांपासून मला सोशल मीडिया काय आहे हे देखील माहित नव्हते कारण माझ्या मते ते विचलित करण्याचे काम करते. तिने आपल्या फोनवरून सर्व सोशल मीडिया अॅप्स काढून टाकले. दरम्यान, अंकिता इतर उमेदवारांना वाचनाबरोबर लेखनाचा सराव करण्याचा सल्ला देते, कारण अनेकदा उत्तरे माहित असूनही आपण त्यांना प्रभावी मार्गाने लिहू शकत नाही. मॉक टेस्ट द्या आणि आपल्या चुका चिन्हांकित करा, जेणेकरून आपण त्या पुन्हा पुन्हा करणार नाही.