Success Story | नोकरी सोडून बनली ‘BSc चहावाली’, वडिलांनी तोडले नाते, इतक्या कमाईमुळे तुफान चर्चेत

नवी दिल्ली : Success Story | भारतात चहा सर्वाधिक लोकप्रीय पेय आहे. कोणताही ऋतू असो, प्रसंग असो, चहा हे केवळ संवादाचे माध्यम बनते आणि नातेसंबंधात उबदारपणा निर्माण करण्याचे निमित्त ठरते (Success Story). गेल्या काही वर्षांत चहाच्या स्टॉलचे अनेक स्टार्टअप्स (Startup Ideas) सुरू झाले आहेत, जे देशभरात चर्चेत आहेत (Success Story, BSc Chaiwali Tea Stall).

एमबीए चहावाला, बी. टेक. चहावालानंतर आता बीएससी चहावाली (Tea Stall Business) चर्चेत आहे. बीएससी पास असलेल्या मुलीने नोएडामध्ये स्वतःचा चहाचा स्टॉल उघडला आहे. यासाठी तिने आपली नोकरी सोडली. एवढेच नाही तर चहा विकत असल्याने तिच्या वडिलांनी तिच्याशी नातेसंबंध तोडले. पण तिने हार मानली नाही. बीएससी चहावाली पार्वतीची सक्सेस स्टोरी जाणून घ्या. (Success Story)

व्हायरल झाले चहाचे दुकान
नोएडातील सेक्टर ४५ मध्ये राहणाऱ्या पार्वतीने चेतराम शर्मा कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून बीएससी मॅथेमॅटिक्स केले आहे. ती मूळची बिहारच्या मधुबनीची आहे. तिचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात आणि भावाची कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. दुसरीकडे, पार्वतीने तिची १० हजाराची नोकरी सोडून सेक्टर १६ मेट्रो स्टेशनजवळ चहाचे दुकान उघडले आहे.

सामोरे जावे लागले वडिलांच्या नाराजीला
पार्वतीला स्वतःला सक्षम बनवायचे होते, म्हणून तिने चहाचे दुकान उघडून कामाला सुरुवात केली. अर्थात पार्वतीच्या वडिलांनी तिला यात साथ दिली नाही, पण भावाची मिळालेली साथ तिला पुरेशी होती. एवढेच नाही तर पार्वतीच्या नातेवाइकांनीही तिच्याशी संबंध तोडले. पण ती ध्येयावर ठाम राहिली.

नोकरीपेक्षा जास्त कमाई
बीएससी चहावाली पार्वती तिच्या चहाच्या स्टॉलमधून दररोज १०००-१२०० रुपये कमावते.
यानुसार एका महिन्यात ३० हजारांहून जास्त उत्पन्न मिळते. ही रक्कम पार्वतीच्या नोकरीच्या पगारापेक्षा
जास्त आहे. एमबीए चहावाला प्रफुल्ल बिल्लोर (MBA Chai Wala Prafull Billore) याच्याकडून प्रोत्साहित होऊन पार्वतीने चहाचे दुकान उघडले आहे.

प्रसिद्ध आहेत चहाचे फ्लेवर्स
पार्वतीच्या दुकानात अनेक फ्लेवर्सचे चहा मिळतात. एक कप चहाची किंमत १०-१५ रुपये आहे.
सेक्टर १६ मध्ये दुकान असल्याने मोठ्या कंपन्यांचे लोक चहा पिण्यासाठी रांगा लावतात.
बीएससी चहावालीच्या टी स्टॉलवर सामान्य चहा व्यतिरिक्त, पान चहा, चॉकलेट चहा आणि मसाला चहा
देखील मिळतो (Tea Flavours).

Web Title :- Success Story | success story of bsc chaiwali parvati tea stall business tea stall in noida news startup ideas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी 100 कोटी, लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करणार

Aurangabad ACB Trap | घराचा उतारा देण्यासाठी 9 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात