मोठी बातमी ! SRDR चे नवे तंत्रज्ञान; आता आवाजाविनाच मिसाईल पोहोचेल शत्रूंपर्यंत

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – भारताकडून सुरक्षेच्या मुद्द्यावरून सातत्याने विशेष पावले उचलली जात आहेत. त्यातच आज भारताला एक मोठे यश मिळाले आहे. ‘डिफेन्स रिकन्स्ट्रक्शन सपोर्ट ऑफिस’ (DRSO) ने ओडिशाच्या चांदीपूर टेस्ट रेंजमध्ये सॉलिड फ्यूल डक्टेड रॅमजेट (SRDR) तंत्रज्ञानाचे फ्लाईट टेस्ट करण्यात आले. याचे परिक्षण यशस्वीरित्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

भारत या मिसाईलमुळे जास्त शक्तिशाली होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. DRDO ने एसडीएफआरच्या यशस्वी परीक्षण केले आहे. DRDO कडून हे परीक्षण शुक्रवार सकाळी साडेदहा वाजता झाले. ही एकप्रकारे बूस्टर इंजिन आहे. जो मिसाईलला आणखी शक्तिशाली बनवण्यासाठी मदत करतो. सुरक्षेत चांगल्या उपकरणांशिवाय भारत स्वदेशातही तेजीने आपलेसे केले आहे. ही एक पूर्णपणे स्वदेशी टेक्निक आहे. DRDO कडून एक ट्विट करण्यात आले, यामध्ये सांगितले, की बूस्टरसह सर्व सिस्टिमने अपेक्षानुसार काम केले आहे.

दरम्यान, रॅमजेट तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानंतर क्षेपणास्त्राची शक्ती वाढेल. या मिसाईलचा वेग आणखी वाढवणार आहे. इतकेच नाही तर तंत्रज्ञानाच्या वापरानंतर शत्रूंच्या दिशेने गेलेल्या मिसाईलचा आवाज येणार नाही. तसेच आकाशात धूरही येणार नाही.