असाही एक कार वेडा… नंबरसाठी मोजले एवढे पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या पसंतीची कार खरेदी करावी आणि त्याला आपल्या पसंतीचा नंबर मिळावा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या हौसेसाठी कारच्या किंमतीएवढेच पैसा नंबरसाठी मोजणारी माणसे आहेत. हौसेसाठी कारचा नंबर आकर्षक मिळावा यासाठी वाट्टेल तेवढी रक्कम मोजली जाते. केरळमधील एका व्यक्तीने त्याच्या Porsche 718 Boxster कारच्या नंबरसाठी तब्बल 31 लाख रुपये खर्च केले आहेत.

केरळची राजधानी तिरुवअनंतपुरममध्ये काल (सोमवार) आरटीओ विभागाने KL 01 CK 1 या एकमेव नंबरसाठी लिलाव आयोजित केला होता. या नंबरसाठी तिरुवअनंतपुरममधील औषधांचे व्यापारी के. एस. बालगोपाळ आणि दुबईचे दोन एनआरआय यांनी बोली लावली होती.

महत्वाचे म्हणजे य़ा नंबरसाठी ५०० रुपयांपासून बोली सुरु झाली होती. ही बोली १० लाखांवर गेल्यावर दुबईतील आनंद गणेश यांनी माघार घेतली. तर हीच बोली २५.५5 लाखांवर गेली तरीही दुबईचे दुसरे भारतीय शाईन युसुफ स्पर्धेमध्ये टिकून होते. मात्र, बालगोपाळ यांनी ३० लाखांचा आकडा सांगितला आणि युसुफ यांनीही माघार घेतली. अशा प्रकारे बालगोपाळ यांनी हा नंबर जिंकला. त्यांनी आरटीओला एकूण ३१ लाख रुपये दिले. यामध्ये ३० लाख रुपये बोलीचे आणि १ लाख रुपये अर्जाचे शुल्क होते.

Porsche 718 Boxster च्या या कारची किंमत १.२ कोटी रुपये आहे. बालगोपाळ यांनी Toyota Land Cruiser साठीही आकर्षक नंबर घेतला होता. यावेळी त्यांनी १९ लाख रुपये मोजले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us