‘कोरोना’पासून वाचण्यासाठी ‘अशी’ वाढवा रोगप्रतिकारशक्ती

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक जण घाबरून गेले आहे. मात्र घाबरून न जात आपण सोप्या उपायांद्वारे कोरोनाला दोनहात लांब ठेऊ शकतो . कोरोनाला मात करण्यासाठी उत्तम रोगप्रतिकार शक्ती असणे गरजेचे आहे . मग हि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमके क्काय करायला हवे ते जाणून घेऊया

  तुमचा दैनंदिन जीवनक्रम बदलू नका. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा.

कफ न वाढवणारा आहार घ्या. सात्विक आणि हलक्‍या आहारावर भर द्या.

  अतिमसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ खाणे टाळा.

–  हळद ही बहुगुणी आहे. हळदीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दूध आणि पाण्यातून हळद घेतल्याने फायदा होतो.

  घशात खवखव वाटत असल्यास पाण्यात हळद घालून गुळण्या करा.

–  च्यवनप्राश घेताना तो डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच घ्या.

  तुळशीची पाने आणि आल्याचा रस मधात घालून खाल्ल्यानेही फायदा जाणवतो.

  चहा वारंवार घेऊ नका. चहामुळे पित्त वाढते.

दुधात साखरेसोबत हळद, मिरी आणि दालचिनी समप्रमाणात घालून काढा करावा. चहाऐवजी हा काढा गुणकारी ठरतो. मधुमेह असलेल्यांनी मात्र यात साखरेचा वापर करू नका.

  तयार मसाला जेवणात वापरू नका. घरात असलेल्या खडा मसाल्याचासुध्या वापर जेवणात करा. मसाल्याचे पदार्थ अग्नी वाढवतात. शरीरात अग्नी वाढल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

शरीरस्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ स्वस्थ असणे गरजेचे आहे त्यासाठी क्काय करावे जाणून घेऊया

1.  टीव्ही, मोबाईल पाहण्यापेक्षा रिकाम्या वेळात वाचन करा.

2.  स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी आणि . छंद जोपास

3.  स्वतःला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा

4.  कुटुंबासमवेत वेळ घालवताना सर्वांना एकत्र खेळता येईल असे बैठे खेळ खेळा .

5. योगासने आणि ध्यानधारणेद्वारे शरीर आणि मन शांत ठेवा