TV मालिकांचा एकच ‘फंडा’, ‘प्रेमात आडवा अन् TRP वाढवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या मालिकांमध्ये एक फंडा जास्त वापरला जाताना दिसत आहे. अनेकांना माहिती आहे की, प्रेमात जर तिसरा कोणी येत असेल त्यात कथेत प्रेक्षकांना जास्त रस असतो. हीच बाब लक्षात घेता अनेक मालिका हा फंडा वापरताना दिसत आहे ज्याचा फायदा टीआरपीसाठी होईल. हिरो हिरोईनच्या प्रेमात तिसरा आडवा येतो आणि ती मालिका रंगताना दिसते.

तुम्ही काही मालिकांवर नजर टाकली तर तुमच्याही लक्षात येईल की, हिरो हिरोईनच्या प्रेमाला तिसऱ्या व्यक्तीकडून विरोध होताना दिसत आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर प्रेम पंगा पॉयजन आणि रंग माझा वेगळा या मालिकांची नावं सांगता येतील. प्रेम पंगा या मालिकेत जुई आणि आलाप यांच्या प्रेमाला जुईच्या आईचा विरोध होताना दिसत आहे. तर रंग माझा वेगळा या मालिकेतही सई आणि नचिकेत यांच्या प्रेमाला अप्पांचा विरोध आहे. आणखी एक अशीच मालिका सांगता येईल. साजणा या मालिकेतही रमा आणि प्रताप यांच्या नात्याला प्रतापच्या बाबांनी नकार दिला आहे.

मालिकेत जरी प्रेमाला जोरदार विरोध होताना दिसत असला तरी याचा शेवट गोड होणार आहे हे प्रेक्षकांना ठाऊकच आहे. परंतु तरीही या मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक टीव्ही समोर बसतील याची मेकर्सना खात्री आहे. कारण त्यांच्या प्रेमात आणखी कोणती विघ्न येतील तसेच आणखी किती रंजक वळणं येतील याची नेहमीच लोकांना उत्सुकता असते. लग्नात काय विघ्न येतील त्यावर कशी मात केली जाईल असे प्रश्नही अनेकांना पडलेले असतात. याशिवाय पुढे काय होणार याची उत्सुकताही लोकांना असतेच.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like