Neha Dhupia Karan Johar Chamchi : ‘नेहा धूपिया करते करण जोहरची ’चमचागिरी’ : सुचित्रा कृष्णमूर्ती

नवी दिल्ली : नुकताच सुचित्रा कृष्णमूर्तीने नेहा धूपियावर करण जोहरची चमचागिरी करण्याचा आरोप केला होता. यानंतर नेहाने सुद्धा सुचित्रावर पलटवार केला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलीवुडमध्ये नेपोटिझमवर चर्चा तापली आहे. यानंतर बॉलीवुडचे अनेक दिग्गज आणि कलाकार नेटिझन्सच्या रडारवर आहेत. नुकतीच अभिनेत्री ते होस्ट बनलेल्या नेहा धूपियावर बॉलीवुड गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीने टीका केली होती.

सुचित्राने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, नेपोटिझमवर नव्हे, तर ’चमचागिरी’वर नाराजी असली पाहिजे. यानंतर तिने नेहा धूपियाचे उदाहरण दिले आणि आरोप केला की, करण जोहरसोबतच्या मैत्रीमुळे, तिने मोठे टॉक शो केले आहेत. मात्र, हे नेहाला चांगले वाटले नाही आणि तिने सुचित्रावर पलटवार केला आहे.

सुचित्रा कृष्णमूर्तीने म्हटले आहे की, बॉलीवुडमध्ये नेपोटिझमच्या ऐवजी चमचागिरीवर चर्चा झाली पाहिजे. माझे हे म्हणणे आहे की, नेहा धूपियाला अचानक इतके चॅट टॉक शो कसे मिळाले, त्याचे कारण आहे करण जोहरशी मैत्री. ती मिस इंडिया 2002 होती, ती कोणत्याही स्टारची मुलगी नाही, आणि कुणाची नातेवाईक सुद्धा नाही.

यावर उत्तर देताना नेहा धूपियाने म्हटले आहे, हे पूर्णणे अपमानकारक आणि घृणास्पद ट्विट आहे. नेहाने आपल्या ट्विटमध्ये, ती आपल्या कौशल्यामुळे या टप्प्यावर कशी पोहचली आणि स्वयंभू महिला कशी आहे, हे सांगितले आहे.

नेहाने लिहिले आहे की, प्रिय मॅडम, माझ्यामते आतापर्यंतचे सर्वात जास्त अपमानकारक आणि घृणास्पद ट्विट मी वाचले. अनेक वर्षांच्या मैत्रीला कमी लेखण्याशिवाय तुम्हाला काहीही माहित नाही. मला स्वतावर गर्व आहे…एक स्वाभिमानी मुलगी, पत्नी आणि आई आहे आणि माझा त्या महिलांशी जवळचा संबंध आहे, ज्या यास स्वीकारतात. #strongwomensupportstrongwomen

काही वेळानंतर सुचित्राने स्वताचा बचाव करत लिहिले, मला माहित होते की मी ट्रोल होणार. माझ्याकडे कुणाच्याही विरूद्ध काहीही व्यक्तीगत नाही. कोणत्याही प्रतिभेशिवाय कुणीही जीवंत राहात नाही. परंतु, हे ऐकू नका की, अनेक लोक काय म्हणत आहेत आणि छोट्या मुलांना या संपूर्ण बहिष्काराचा सामना करावा लागतो. यातून गटबाजी दिसते. (मी चमचागिरी शब्दाचा वापर केला आहे).

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like