तरुणाईत का वाढतोय हार्टअटॅकचा धोका ?, तज्ज्ञांनी सांगितले कारण आणि उपाय

पोलीसनामा ऑनलाईन : सध्याच्या काळात तरूणांमध्ये हार्टअटॅक ( heart attack) किंवा कार्डीएक अरेस्ट (cardiac arrest ) हा आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. छातीत दुखण्यामुळे अचानक मृत्यू झाला, असे अनेकदा तुम्ही ऐकता. वैद्यकीय भाषेत त्याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. तरूणांमध्ये वाढणारे गंभीर आजारांचे प्रमाण लक्षात घेता मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, साकेतचे सीनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. विवेक कुमार (doctor-viveka-kumar ) यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

सडन (अचानक) कार्डियक अरेस्ट म्हणजे काय?
डॉ. विवेक म्हणाले की,सडन कार्डियाक अरेस्ट ही एक आपातकालीन वैद्यकीय स्थिती आहे. ज्यात एखाद्या व्यक्तीचे हृदयाचे अचानकपणे कायर् थांबते. त्यामुळे ह्रदयाचा त्रास होऊ शकतो. हे धोकादायक असू शकते कारण लक्षणे दिसल्यानंतर 1 तासाच्या आत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

असा कार्डियाक अरेस्टचा धोका कोणाला असतो?
30-35 वर्षे वयानंतर कोणालाही ह्रदयाच्या समस्यांचा धोका असू शकतो. सामान्यत: ज्या लोकांमध्ये हार्ट पंपिंगची क्षमता 40 टक्क्यांपेक्षा कमी असते. त्यांना जास्त धोका असतो. तरूणांमध्ये ही बाब वाढण्याचे कारण ताण तणाव आहे. कोरोनाकाळात या आजाराचे प्रमाण वाढले असून कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतरही अनेकांना हृदयासंबंधी समस्या उद्भवल्या आहेत. ह्रदयाचा झटका येण्यापासून बचाव करण्यासाठी महत्वाचे आहे की आपल्याला हृदयाशी संबंधित काही समस्या असल्यास आपण डॉक्टरांशी संपर्क साधून त्या तपासून घ्याव्यात. इकोकार्डियोग्राफी तपासणीद्वारे या रोगाची माहिती मिळवता येऊ शकते. ज्या लोकांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला आहे. ज्यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास आहे किंवा अचानक छातीत दुखण्याप्रमाणे हृदयविकाराची इतर लक्षणे दिसली. तर त्वरित सर्व चाचण्या घेण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि सल्ला घ्यावा. तरुणांनी दैनंदिन जीवनात कमी ताण-घ्यावा, कोणत्याही प्रकारच्या हृदयाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. जर एखाद्यास ही समस्या उद्भवली असेल तर डॉक्टरांच्या सल्लाने औषधांसह काही प्रमाणात जीवनशैलीत बदल बदल्यामुळे याप्रकारच्या समस्या टाळता येऊ शकतात.