Sudden Stop Drinking | काय होते जेव्हा तुम्ही अचानक दारू पिणे बंद करता? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sudden Stop Drinking | जर तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कारण शरीराला दीर्घकाळ दारू पिण्याची सवय असेल आणि ती अचानक बंद केली तर शरीराची यंत्रणा बिघडू शकते. तुमचे डॉक्टर तुम्हाला अल्कोहोल सोडण्याचा योग्य मार्ग सांगतील. Dailystar च्या मते, जेव्हा तुम्ही अचानक अल्कोहोल घेणे बंद करता तेव्हा त्याचे शरीरावर खालील परिणाम दिसू शकतात. (Sudden Stop Drinking)

 

1. एंग्जायटी
2. डिप्रेशन
3. लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता
4. थकवा
5. अस्वस्थता
6. चिडचिड
7. थरथर
8. भावनिक होणे
9. रक्तदाब वाढणे
10. डोकेदुखी
11. भूक न लागणे
12. घाम येणे
13. हार्टरेट वाढणे
14. निद्रानाश

 

मानसिक स्वास्थ्यही राहील योग्य
जर तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमचे मानसिक आरोग्यही खूप सुधारेल. खरं तर, दररोज जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूतील रसायनांच्या कामात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे मेंदूचे अनेक आजार होतात. दुसरीकडे, डॉक्टरांचा सल्ला घेऊन हळूहळू दारू पिणे बंद केले, तर मेंदूतील रसायने चांगले काम करतील आणि मनही शांत राहील. याशिवाय शरीरात अधिक ऊर्जा जाणवेल, झोप चांगली येईल, कामावर लक्ष केंद्रित करता येईल, त्वचा चांगली राहील, वजन कमी (Weight Loss) होईल, दैनंदिन कामावर परिणाम होणार नाही. (Sudden Stop Drinking)

दारूचा शरीरावर काय परिणाम होतो?
दारू पिण्याने शरीराला होणारे नुकसान सर्वांनाच माहीत आहे. ज्या दिवसापासून तुम्ही अल्कोहोल प्यायला सुरुवात करता तेव्हापासून त्याचे दुष्परिणाम शरीरावर वर्चस्व गाजवू लागतात. दारू पिणार्‍या लोकांच्या शरीरात हे परिणाम दिसू लागतात. यातील काही दीर्घ कालावधीनंतर दिसतात, तर काही लवकरच दिसू लागतात.

 

1. मळमळ आणि उलटी
2. डोकेदुखी
3. अतिसार
4. लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता
5. निर्णय घेण्यात अडचण
6. समन्वय करण्यात अडचण
7. बेशुद्धी
8. स्मृती भ्रंश
9. हृदयरोग
10. लिव्हर डिसीज
11. स्वादुपिंडाचे नुकसान
12. कर्करोग (यकृताचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग इ.)
13. इम्युनिटी कमजोर होणे
14. डिप्रेशन
15. नपुंसकत्व किंवा शीघ्रपतन
16. वंध्यत्व

 

Web Title :- Sudden Stop Drinking | what happens when you stop drinking alcohol anxiety depression fatigue headaches elevated blood pressure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | 22 वर्षाच्या तरुणीवर केला लैंगिक अत्याचार; हडपसर पोलिस ठाण्यात तरूणाविरूध्द FIR

 

MP Vinayak Raut | ‘… तर हे 40 आमदार एकमेकांच्या उरावर बसतील’, शिवसेना खासदाराचा दावा

 

Ganeshotsav 2022 | आफ्रिकेत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, असा वाजवला नगारा; व्हिडिओ करेल आश्चर्यचकित

 

Maharashtra Cabinet Expansion | ‘शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आणखी 23 जणांना संधी मिळू शकते’ – सुधीर मुनगंटीवार