‘दबंग- 3’मध्ये ‘हा’ अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत 

मुंबई : वृत्तसंस्था – सलमान खानचे  ‘दबंग’, ‘दबंग -२’  चित्रपट सुपरहिट झाले होते. या चित्रपटात सलमान इतकेच खलनायकाच्या  भूमिकाही गाजल्या. दबंग मध्ये सोनू सूद खलनायक होता. तर दबंग -२ मध्ये प्रकाश राज खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. पण  ‘दबंग-३’ या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर दबंग-3 मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी दक्षिणेकडील अभिनेता सुदीपचे नाव निश्चित झाले आहे.

‘सुदीप आणि  सलमान हे चांगले मित्र आहेत. नुकतंच सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सुदीपच्या ‘पैलवान’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांना एकत्र काम करायचे होते. अखेर दबंग-3 च्या निमित्ताने त्यांना ती संधी मिळाली आहे. दबंग-3 मध्ये सुदीपची भूमिका खलनायकाची आहे.’ असे सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समजते. दरम्यान या चित्रपटात दोन खलनायक असणार असल्याचे देखील बोलले जात आहे. सुदीप व्यतिरिक्त तेलुगू अभिनेता जगपती बाबू हा देखील खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसापूर्वी अरबाज खानने खुलासा करत सांगितले होते की ‘दबंग-३’चे एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. तर या चित्रपटाचे  दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. दबंग-३ ची सुरुवात करण्यापूर्वी सलमान खान ‘भारत’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. ‘दबंग-३’ चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. याबद्दल सांगण्याची वेळ येईल, तेव्हाच याचा खुलासा करणार असल्याचे अरबाज खानने म्हटले आहे.