नगरमधून वंचित बहुजन आघाडीचे ‘हे’ आहेत उमेदवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहे. नेवासा येथील सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे नगर लोकसभा मतदारसंघातून प्रा. किसन चव्हाण, डॉ. अरुण जाधव, सुधाकर आव्हाड यांची नावे चर्चेत होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नेवासा येथील सुधाकर आव्हाड यांचे नाव जाहीर केले आहे. आव्हाड यांना डॉ. सुजय विखे व आ. संग्राम जगताप या तगड्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे.

सुधाकर आव्हाड यांचा मतदारसंघातील संपर्क पाहता ते स्पर्धेत टिकतील, असे वाटत नाही. मात्र त्यांचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला निश्चित बसू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Loading...
You might also like