Sudhir Mungantiwar | … तेव्हा पुण्यात असाच जल्लोष झाला, संजय राऊतांच्या जामिनावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात (Goregaon Patrachal Scam) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचा आज पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) जामीन मंजूर (Bail Granted) केला. यावर भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जामिन मिळाला म्हणजे निर्दोष मुक्तता झाली असे होत नाही. केसचा निकाल अद्याप बाकी आहे. जेव्हा निर्दोष मुक्तता होईल तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल असं सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

 

पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, भाजप किंवा कोणताही राजकीय पक्ष म्हणून एका विशिष्ट नजरेने बघण्याची गरज नाही. तो राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य त्याला विशिष्ट कालावधी नंतर जामीन मिळतो. अर्णब गोस्वामी (Arnab Goswami), केतकी चितळे (Ketaki Chitale), नवनीत राणा (Navneet Rana) यांना देखील जामीन मिळाला. जामिनाचा केसच्या निर्णयाशी संबंध नसतो. जामीन मिळाला म्हणजे निर्दोष मुक्तता झाली असे होत नाही. ही अटक जर बेकायदेशीर असेल तर कोर्ट त्यांची निर्दोष मुक्तता करु शकते, असेही ते म्हणाले.

 

संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. हातात मशाली घेऊन घोषणाबाजी केली.
यावरुन देखील सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना टोला लगावला. जामीन मिळाला आहे,
केसचा निकाल लागलेला नाही. अनेक लोक जामीनावर बाहेर येतात.
गजानन मारणे (Gangster Gajanan Marne) जेव्हा सुटला तेव्हा देखील जल्लोष झाला होता, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

बाकीचे दिवस झोपा काढायच्या का?
यावेळी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील टोला लगावला.
उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते जनतेची सेवा करत नसावेत.
निवडणुका आल्या की कामाला लागा आणि मग बाकीचे दिवस काय झोपा काढायच्या का?,
मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) कशा होतील याचे विश्लेषण त्यांनी करावे असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sudhir Mungantiwar | bjp leader sudhir mungantiwars reaction on sanjay rauts bail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rashmika Mandanna | सततच्या ट्रोलिंगला वैतागून रश्मीकाने केली ‘हि’ पोस्ट सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

MP Sanjay Raut | तुरुंगाबाहेर येताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-‘आलोय बाहेर… आता बघू, आम्ही…’

Har Har Mahadev | “‘हर हर महादेव’ चित्रपट बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिला का?” आंनद दवेंची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका