Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘हे सरकार ‘बेवड्यांना’ समर्पित’

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sudhir Mungantiwar | नुकतंच राज्य शासनाच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेण्यात आला आहे. सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये (Supermarket Or Walk-In Store) ‘शेल्फ-इन-शॉप’ पद्धतीने वाइनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान सरकारच्या या निर्णयानंतर भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भाजपने टीका देखील केली आहे. यानंतर भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देखील ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार प्रहार केला आहे. ”हे बेवड्यांना समर्पित असलेले सरकार आहे,” असा हल्लाबोल मुनगंटीवार यांनी केला आहे.

 

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, ”जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणारं सरकार शेतकरी, कष्टकरी वंचिताच्या हिताचे निर्णय घेत असते. पण जेव्हा एखादे सरकार बेईमानीच्या आधारावर निवडून येते. जनादेशाचा अवमान करून निवडून येते, अशा सरकारच्या हातून बेवड्यांची सेवा घडते. हे पुर्णपणे बेवड्यांना समर्पित सरकार असल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे.

पुढे सुधीर मुनगंटीवार म्हणाले ”आगोदर जनतेच्या आशीर्वादाने निवडणून येणारे सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेत होते. गेल्या 2 वर्षात कोरोनाच्या महामारीत लोकं दवा चाहिये म्हणतात पण हे सरकार आप दारू लीजीये म्हणतात. पेट्रोल- डिझेलचे भाव कमी केले नाही पण दारुचा 300 टक्के असणारा कर 150 टक्के केला. शेतकऱ्यांच्या कनेक्शनला मदत केली नाही. पण वाइन प्रोत्साहन योजनेला पैसे दिले. चंद्रपूरची दारुबंदी हटवली. सरकारकडे कुठेही तर्क नाही. तर, ‘सुपरमार्केटमध्ये आता दारु विकणार. हे महाराष्ट्र हे समाजसुधारकांचे राष्ट्र आहे. हे समाज बिघडवणाऱ्यांच्या हातात गेलंय. दारुवर काय प्रेम आहे मला माहिती नाही. पण जनतेनं याची नोंद घेतली पाहिजे,” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Sudhir Mungantiwar | bjp mla sudhir mungantiwar attacks on maharashtra government over cabinet nod to sale of wine in supermarket

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा