
Sudhir Mungantiwar | ‘CM एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाहीत’; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा, सांगितली ‘ही’ कारणे
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sudhir Mungantiwar | आमदार अपात्रतेच्या निर्णयाला विलंब होत असल्याने शिवसेनेसह विरोधकांकडून टीका होत आहे (Shiv Sena MLA Disqualification). आता भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाही, असा दावा केला आहे. भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हा दावा केला आहे (Maharashtra Politics).
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दुसऱ्या पक्षात गेले नाहीत. त्यामुळे अपात्र होणार नाहीत. भाजपने मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाठिंबा दिलाय. संख्येचा विचार केल्यास शिंदे यांच्यासोबत ४० आमदार गेले. ही संख्या मोठी असल्याने ते अपात्र होणार नाहीत. (Sudhir Mungantiwar)
मुनगंटीवार म्हणाले, आमदार अपात्र होण्यासाठी विधानसभेत व्हिप काढावा लागतो. प्रतोदने व्हिप काढला आणि त्या व्हिपचे उल्लंघन केले तर पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून संबंधित आमदार अपात्र होऊ शकतात.
मुनगटींवार यांनी म्हटले की, कोणत्या पक्षाची जबाबदारी कुणाकडे असावी? पक्षप्रमुख कोण? त्या पक्षाचे चिन्ह कुणाकडे
असावे? याचा निर्णय संविधानानुसार निवडणूक आयोग घेते. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह
मिळाले आहे. पक्ष प्रमुखाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्यामुळे व्यक्तिगत कुणी विचारले तर शिंदे गटाकडून
कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही, ज्यामुळे तुम्ही त्यांना अपात्र करू शकाल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा