Sudhir Mungantiwar | राज ठाकरेंच्या सभेनंतर भाजपची उद्धव ठाकरेंना ‘ऑफर’?, सुधीर मुनगंटीवार म्हणाले – ‘उद्धवजी, अजूनही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुरुवारी विधान परिषदेमध्ये (Legislative Council) उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आमने-सामने आले. युती तोडल्यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. परंतु याचवेळी बोलताना मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ‘उद्धवजी पुन्हा एकादा शांततेनं विचार करा, झाड वाढवायचा विचार करा’ असं म्हणत ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे युतीची ऑफरच दिल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

मागील सरकारच्या काळातील एका वृक्षारोपण योजनेविषयी (Tree Plantation Scheme) विधानपरिषदेत बोलताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला. उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो की झाडाला फळ येतील. पण तुम्ही झाडाशीच नातं तोडलं. आता त्याला काय करणार. मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की, उद्धवजी, या झाडाला कोणतं खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिलं. त्यामुळेच त्या झाडाला फळं कशी येतील? मी एकदा नाही, तीनदा विनंती केली होती, असं मुनगंटीवार म्हणाले.

त्यांच्या या टिप्पणीवर उद्धव ठाकरे यांनी निरमा पावडरचा उल्लेख करताच विरोधी बाकांवर हास्याची लकेर उमटली. ‘त्याच्या ऐवजी निरमा पावड टाकली तुम्ही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमचा गैरसमज झाला

उद्धव ठाकरे यांच्या खोचक टोल्यावर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देताना ठाकरेंना खोचक सल्ला दिला. खतच होतं. पण ते निरमा पाकिटात आल्यामुळे तुमचा गैरसमज झाला. आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं आणि द्रव्य झाड जळणारं होतं ते टाकलं. पण अजूनही काही बिघडलेलं नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा शांततेत विचार करा झाड वाढवण्याचा, असा सूचक सल्ला त्यांनी देताच सभागृहात हशा पिकला.

Web Title :- Sudhir Mungantiwar | bjp sudhir mungantiwar mocks uddhav thackeray shivsena on alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | 40 टक्के करासहीत भरलेली रक्कम परत कारावी, महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Crime News | पुण्यातील नाना पेठेत थरार ! हत्याराचा धाक दाखवुन भरदिवसा व्यापार्‍याचे 47 लाख लुटले