Sudhir Mungantiwar | ‘बरेच आमदार बाहेर निघतील, उद्धव ठाकरे राजकारणात राहून काय करणार?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विविध मुद्यांवरुन राजकीय वातावरण तापले आहे. मविआचे नेते आणि सत्ताधारी यांच्या आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या केलेल्या टिकेचा भाजप (BJP) नेते खरपूस समाचार घेत आहेत. परंतु उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजकारणात राहून काय करणार, असा सवाल भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकारणात राहण्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.

 

राज्यातील सापनाथ-नागनाथ एकत्र आले तरी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा पराभव करु शकत नाहीत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना केले होते. यावर बोलताना नागनाथ-सापनाथ यांची इथे पूजा केली जाते. तुम्ही हिंदू आहात ना? अशी विचारणा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

 

राजकारणात राहून काय करायचे?

उद्धव ठाकरेंना पक्षाचे आमदार टिकवता आले नाहीत. यांनी खरेतर राजकारणात राहून काय करायचे? ना जनतेचा विश्वास संपादन करता येत, ना जनतेचा विकास करता येत. शिवसेनेत 40 आमदार फुटतात, काहीतरी दोष असेल ना? तुमचा काहीच दोष नाही का? विचारांचा दोष नक्कीच नाही, दोष तुमच्या कृतीचा आहे. आचरणाचा आहे. तुम्ही ज्या वृत्तीने वागता त्याचा दोष आहे. विश्वासाने सांगतो की, यांचे बरेच आमदार आता बाहेर निघतील. कारण यांच्या स्वभावाला कुणी टिकूच शकत नाही, असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

 

खोटं बोलणं मूळ स्वभाव

शाब्दिक कोट्या करण्यात काही अर्थ नाही. ठाकरे दोन वर्ष आठ महिने मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याची काय अवस्था केली? आर्थिक अवस्था वाईट आहे. लोकांशी खोटे बोलायचे, शेतकऱ्यांशी खोटे बोलायचे. हा यांचा मूळ स्वभाव आहे. यांची जुनी भाषणे काढा. म्हणाले 25 वर्ष आम्ही भाजपसोबत सडलो आणि पुन्हा भाजसोबत युती केली, असा पलटवार मुनगंटीवार यांनी केला.

 

 

Web Title :  Sudhir Mungantiwar | bjp sudhir mungantiwar replied shivsena thackeray group over criticism of dcm devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा