उध्दव ठाकरेंनी ‘खोटारडे’पणाचा केलेला दावा एकदम खोटा : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा दावा खोटा आहे असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेला खोटारडेपणाचा आरोपही फेटाळून लावला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी भाजपावर केलेला खोटारडेपणाचा आरोप आम्ही खारिज करतो. विधानसभा निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री पदाला घेऊन कोणतंही बोलणं झालं नव्हतं. भाजपला सत्तेवर नाही तर सत्यावर प्रेम आहे. आम्हाला फक्त विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे जनतेला वेठीस धरण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. चर्चा करायची सोडून शिवसेना टीका करत आहे. ही टीका कशासाठी? सत्तेत राहून शिवसेनेनं मोदी-शहांवर टीका केली आहे. सत्तेच्या समान वाटपाबाबत कोणताही करार झाला नव्हता.” असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. आमच्यासाठी राम मंदिर महत्त्वाचं आहे असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ” विधानसभा निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री पदाला घेऊन कोणतंही बोलणं झालं नव्हतं. पहिल्या दिवशीच शिवसेनेनं म्हटलं होतं की, आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. शिवसेनेनं पहिल्याच दिवशी पर्यायची भाषा का केली ? असा सवालही मुनगंटीवार यांनी केला. शिवसेनेचे सर्व आरोप भाजपनं फेटाळून लावले.

Visit : Policenama.com