‘त्या’ दोघांची ‘भेट’ म्हणजे कोणत्याही क्षणी महाराष्ट्राला ‘गोड’ बातमी मिळणार : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा गोड बातमी येणार असल्याचे म्हणले आहे. याला कारण ही तसेच होते. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र आले. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते असे म्हणले आहे.

मुनगंटीवार यांनी सूतोवाच केले की लवकर गोड बातमी महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात ती येऊ शकते. आजची अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे सरकारला कोणत्याही क्षणी स्थगिती मिळू शकते.

यावेळी बोलताना मुनगंटीवार यांच्या महाविकासआघाडीचा समाचार घेतला. या युतीचा जन्मच मुळात कामाच्या आधारावर किंवा विकासाच्या नावावर झालेला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचा जन्म सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपायी झाला. महाराष्ट्र आघाडीचा जन्म जनादेशाचा अवमान करत, महाराष्ट्राचा अपमान करत झालेला आहे.

खातेवाटप हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. सरकार स्थापन करायला उशीर, कामाची सुरुवात व्हायला उशीर, मला वाटते की चिऊताई चिऊताई दार उघडची कथाच संपून जाईल आणि म्हणून आमच्या सदिच्छा आहेत असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर देखील टीका केली.

यावेळी मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंच्या बंडावर भाष्य केले. ते म्हणाले की खडसे, तावडे, बावनकुळे, मेहताजी हे सर्व भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबरोबर मी काम केले आहे. त्यांनी आयुष्यभर भाजपच्या विस्तारासाठी, पक्षवाढीसाठी जिवाचं रान केलं. काही बाबतीत नाराजी असेल परंतू ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करु.