वारिस पठाण औरंगजेबाचे ‘वारिस’, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – एमआयएम चे नेते आणि भायखळा चे माजी आमदार वारीस पठाण यांनी एक वादग्रस्त विधान केले होते ,की आम्ही १५ कोटी आहोत पण १०० कोटींना भारी आहोत. यावर राज्यभरात वारीस पठाणांविरुद्ध तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यानंतर वारीस पठाण ह्यांनी आपले विधान मागे घेतले असले तरीही त्यांनी, अजून माफी मागितलेली नाही आहे.

यावरून माजी वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पठाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता तर फक्त वाघिणी बाहेर पडल्या असून, जर आम्ही त्यांसोबत आलो तर काय होईल असे म्हणतानाच त्यांनी आम्ही १५ कोटी आहोत पण, तुम्हा १०० कोटींवर भारी आहोत. असे आक्षेपार्ह विधान वारीस पठाण यांनी केले होते.

परंतु पठाण यांनी आपले विधान मागे घेतले असले तरीही माफी मागितली नाही त्यामुळे , वारीस पठाण हे औरंगजेबाचे वंशज असून, १०० मावळे त्यांना अडचणीत आणतील अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे . जनता जनार्दन त्यांना कधीही माफ करणार नाही असे ही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

You might also like