Sudhir Mungantiwar | भाजपा राज्यातले मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार?

Sudhir Mungantiwar

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sudhir Mungantiwar | आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपा महाराष्ट्राच्या (Maharashtra BJP) मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि आमदारांना रिंगणात उतरवणार आहे. यामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar), सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना तिकीट दिले जाईल, अशी चर्चा आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Sudhir Mungantiwar)

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचा सामंजस्य करार करण्यासाठी लंडनला जात आहे. तेथून आल्यावर मी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटेन. त्यांनी यासंदर्भात काही सांगितले तर मी तुम्हाला सांगतो. (Sudhir Mungantiwar)

मुनगंटीवार पुढे म्हणाले, तेव्हाचे तेव्हा बघू. उद्या आम्हाला पक्षाने सांगितले की राजकारण बंद करा, तर मी राजकारण बंद करेन. हा प्रश्नच येत नाही. भाजपाचा कार्यकर्ता हा अनुशासनप्रिय आहे. प्रसारमाध्यमं आत्तापासूनच काही लोकांच्या हृदयात धडकी भरवण्याचे काम का करत आहात?

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर, रवींद्र चव्हाण यांना ठाणे, राम सातपुते यांना सोलापूर, राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई, चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा आणि विनोद तावडे यांना मुंबईतील मतदारसंघातून तसचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची भाजपाची खेळी असल्याची चर्चा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune Crime News | सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉय विजय ढुमेचा कोयत्याने सपासप वार करून खून, प्रचंड खळबळ

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का! राज्यातील मंत्र्याच्या भावानं स्टेटसवर ठेवलं ‘मशाल’ चिन्ह

Sachin Waze | खंडणी प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर

Prakash Ambedkar – Lok Sabha Elections | दिवाळीनंतर देशात ‘कत्तल की रात’… – प्रकाश आंबेडकर

Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही’ – शरद पवार

Deepak Kesarkar On BJP | शिंदे गटातील मंत्र्याचे मोठे विधान, म्हणाले – ‘…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता’

Congress Demands Action Against Gunaratna Sadavarte | गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसचे
आव्हान, म्हणाले – ‘गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची हिंमत दाखवा’

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’