… म्हणून भाजप विधिमंडळाच्या बैठकीला मुनगंटीवार राहिले ‘गैरहजर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाच्या विधिमंडळ बैठकीला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार गैरहजर गैरहजर राहिल्याने अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत. मुनगंटीवार नाराज असल्याचीही चर्चा आहे. यावर आता मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सध्या भाजपमधील काही नेते नाराज असून यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी जाहीरपण आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवारांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार गैरहजर होते. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाली. त्यानंतर सायंकाळी तातडीने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची मुनगंटीवार यांच्याबरोबर सुमारे पाऊण तास चर्चा झाली. या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी नाराज नसून वैयक्तिक कारणांमुळे भाजप विधिमंडळच्या बैठकीला हजर नव्हतो, पक्षाची तशी परवानगी घेतली होती.

भाजपामध्ये सध्या ओबीसी समाजाचे प्रमुख नेते नाराज आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे या नेत्यांनी अगोदरच आपली नाराजी उघड केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे राज्यातील भाजपा नेतृत्व धास्तावलेले असल्याचे दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/