Sudhir Mungantiwar | ‘गजा मारणेचंही असंच स्वागत झालं होतं’; संजय राऊतांच्या स्वागतावर मुनगंटीवारांचा खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ईडीच्या कारवाईनंतर (ED Action) आक्रमक झालेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांचे मुंबईत जंगी स्वागत (Welcome At Mumbai Airport) करण्यात आले. मुंबई विमानतळावर उतरताच संजय राऊत यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात ‘योद्धा परतला’ म्हणत शिवसैनिकांनी राऊतांचे समर्थनार्थ घोषणा बाजी केली. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावर भाजप नेते (BJP Leader) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. पुण्याचा गुंड (Pune Criminals) गजा मारणेचंही (Gaja Marne) असंच स्वागत झालं होतं, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राऊतांना टोला लगावला.

 

शिवसैनिकांनी संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संजय राऊत यांच्या स्वागतावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, पुण्यात गजानन मारणे (Gajanan Marne) नावाचा गुंड होता, तो सुटल्यानंतरही त्याचं स्वागत झालं. मग तो आदर्श पुरुष आहे का? प्रत्येकाने कुटुंबातील सदस्याला सांगायचं तू गजानन मारणेच हो, हे सांगण्यासारखं आहे का? अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी राऊतांवर खोचक टीका केली.

 

नारायण राणेंचा सवाल
संजय राऊत यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री (CM) पदावर?’ असा सवाल राणेंनी केला.

 

Web Title :- Sudhir Mungantiwar | pune criminal gaja marane was also welcomed like this sudhir mungantiwar on sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर