सत्तास्थापनेबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी केला ‘हा’ मोठा ‘दावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्याचे वृत्त आल्यानतंर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला निमंत्रण दिलं आहे. यानंतर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला की भाजपकडे 18 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे.

राज्यात सत्तास्थापनेवरुन भाजप शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. काल फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. परंतू सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले 145 चे बहुमत भाजपकडे नाही. राज्यपालांनी भाजपला 11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेसाठी बोलावले असताना भाजपला या दरम्यान संख्याबळाची जमावाजमवं करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान भाजपकडे 18 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केला.

भाजपकडे 105 आमदारांचे संख्याबळ आहे तर अजून 18 अपक्ष आमदारांचा पाठिंबा भाजपला आहे. परंतू बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी 22 आमदारांची भाजपला गरज आहे तेव्हा कुठे भाजप 145 चा आकडा गाठू शकेल. बहुमताचा आकडा कसा गाठायचा यावर उद्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करु अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राज्यपालांच्या निमंत्रणावर उद्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. बहुमताचा आकडा कसा गाठता येईल यावर चर्चा करु. ज्यांच्या विरोधात निवडणूका लढवल्या त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रश्नच येत नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा असे मत देखील सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

यावर दिल्लीतील नेत्यांशी संपर्क साधणार का यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही चर्चा केल्यानंतर आवश्यकता भासल्यास दिल्लीतील नेत्यांना संपर्क साधू. परंतू आम्हाला वाटते की युतीचे सरकार स्थापन व्हावे. जनादेश दिलेले सरकार स्थापन व्हावे असे आम्हाला वाटते. सत्ता स्थापनेसाठी कोणतीही मुदत नाही. परंतू सरकार स्थापन झाले नाही तर राज्यपाल सत्ता स्थापनेची वाट पाहणार नाही, ते पुढील विचार करतील असे देखील मुनगंटीवार म्हणाले.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like