ड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर…. : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक( Nawab Malik) यांना त्यांच्या जावयावरील एनसीबीच्या कारवाईवरुन भाजपचे सुधीर मुनगंटीवार( sudhir mungantiwar) यांनी मंत्री नवाब मलिक याना उद्देशून टोला लगावला आहे. ड्रग्जमध्ये जर एखाद्या मंत्र्यांचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची पूजा करायची का?”, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.

पुढे मुनगंटीवार म्हणतात, नवाब मलिक हे मंत्री आहेत म्हणून त्यांच्या जावयाने काहीही करावं का? कायद्यानुसार जर कारवाई होत असेल तर मग त्यात राजकारण कशाला आणता? आरोप जर गंभीर आहेत मग त्यात राजकारण कसलं? तपास करुन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. तसेच राजकीय नेत्यांनी आता प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे असं सांगून राजकीय नेत्यांबद्दल सामान्य जनतेमध्ये अतिशय वाईट प्रतिक्रिया निर्माण होते. तपासात राजकारण नव्हे, तर जे सुशिक्षित आणि उत्तम शिक्षण घेऊन तपास यंत्रणेत काम करत आहेत. तर त्यांच्यावर विश्वास न दाखवता आणि मुद्दाम कुणी राजकारण केलंच तर त्याला न्यायालयं आहेत. तिथे न्याय मिळतोच, असंही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.